मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. मावळ ( Maval News ) तालुक्याला पहिल्यांदाच 2 तहसीलदार ( Maval Tehsildar ) मिळाले आहेत. मावळ तालुक्यात एकूण 190 गावे असून आजपर्यंत या सर्व गावांचा भार हा एकाच तहसीलदार यांच्या शिरावर असायचा. त्यांच्या जोडीला दोन ते तीन नायब तहसीलदार असत. परंतू आता पहिल्यांदाच पुर्णवेळ एका अपर तहसीलदार ( Additional Tehsildar ) यांची नियुक्ती मावळ तालुक्यासाठी करण्यात आली आहे. त्यानुसार तालुक्यातील 60 गावांसाठी अपर तहसीलदार म्हणून अजित दिवटे ( Ajit Diwte ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यात 190 गावे असून वतन, कुळकायदा, निवडणुका, जमीन वादाच्या केसेस व इतर महसुली कामे तहसील कार्यालयात चालतात. अपर तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे 190 गावांपैकी काले-काॅलनी आणि शिवणे मंडळ विभागातील 60 गावांचा महसुली कारभार असणार आहे. ( New Additional Tehsildar Ajit Diwte Appointed For 60 Villages In Maval First Time Two Tehsildars In Taluka )
मावळ तहसील कार्यालयाची स्थापना झाल्यापासून मावळ तहसील कार्यालयात आतापर्यंत 1 तहसीलदार आणि दोन ते तीन नायब तहसीलदार अशी रचना दिसून आली. परंतू आता मावळ तहसील कार्यालयात नव्यानेच अपर तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे.
तीन महिन्यांपूर्वी तत्कालीन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांचा कार्यकाल संपल्याने बदली झाली होती. त्यांच्या जागी विक्रम देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे आता तहसीलदार विक्रम देशमुख आणि अपर तहसीलदार अजित दिवटे यांमुळे तालुक्यातील प्रशासकीय कामे जलदगतीने होईल, असा विश्वास नागरिकांना वाटत आहे.
अधिक वाचा –
– मावळमधील शेतकऱ्यांचा मजूरांच्या तुटवड्यावर लई भारी उपाय! यंत्राच्या सहाय्याने करत आहेत भात लागवड
– जुन्या विहिरीच्या माध्यमातून इतिहासाचा वारसा जपणाऱ्या लव्हेज ग्रामस्थांचा आदर्श प्रेरणादायी – तहसीलदार । Raigad New