मावळ तालुक्यातील मिंडेवाडी (ठाकरवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन वर्ग खोल्या आणि नुतन अंगणवाडीचे उद्घाटन शुक्रवार (20 जानेवारी) रोजी आमदार सुनिल शेळके आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याकरिता एमआयडीसीकडून सहा गुंठे जागा आणि निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे मा सभापती बाबुराव वायकर यांच्या पाठपुराव्याने आता हे काम पूर्ण झाले आहे. नवीन वर्ग खोल्या बांधल्याने कातकरी, ठाकर समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी सुसज्ज शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाली आहे.
मिंडेवाडी (ठाकरवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन वर्ग खोल्या व नुतन अंगणवाडी उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला.एमआयडीसीकडुन सहा गुंठे जागा व निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.जिल्हा परिषदेचे मा.सभापती श्री.बाबुराव वायकर यांच्या पाठपुराव्याने आज हे काम पूर्ण झाले. pic.twitter.com/dTGcVqdnkn
— Sunil Shelke (@shelkesunilanna) January 20, 2023
उद्घाटन प्रसंगी आमदार शेळके यांच्यासमवेत मा सभापती बाबुराव वायकर, सरपंच सविता बधाले, मा सरपंच दत्तात्रय पडवळ, नवनाथ पडवळ, चेअरमन तानाजी जाधव, कामशेत सरपंच रुपेश गायकवाड, इंदोरी सरपंच शशिकांत शिंदे, विस्तार अधिकारी कृष्णा भांगरे, सदस्या विजया शेटे, उषाताई दरेकर, अलका बधाले, नवनाथ पडवळ, भगवान बधाले, बाळु बधाले, दत्तात्रय बधाले, मुख्याध्यापक नयना गवळी, केंद्रप्रमुख मिनीनाथ खुरसुले सर आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– बालाजी तांबे फाउंडेशनतर्फे कार्ला येथील शाळेला अद्ययावत संगणक कक्ष भेट, आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन, पाणपोईचेही भुमीपूजन
– आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेन शाळेत पवनमावळातील महिला पालकांसाठी हळदी-कुंकू समारंभ आणि विविध स्पर्धांचे आयोजन