(दैनिक मावळ प्रतिनिधी) कामशेत हद्दीतील ताजे गावातील गट नंबर 622, 623 मधील प्लॉटिंग मध्ये वडगाव उपविभाग अभियंता यांनी पाहणी केली असता त्यांच्या असे निदर्शनात आले आहे की ताजे येथील वरील गट क्रमांक मध्ये ग्राहकाची वीज बिलाची 81,520 रुपयांची थकबाकी असताना देखील तिथे नवीन वीज जोड कनेक्शन देण्यात आले आहे. ( New Connection Given When Power Bill Is Outstanding Poor Management of Mahavitran Kamshet branch )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यामुळे महावितरण कंपनीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. तसेच कंपनीचा महसूल बुडवला असल्याचे देखील निदर्शनात येत आहे. यामुळे वडगाव मावळ येथील उपकार्यकारी अभियंता यांनी कामशेत विभागाच्या प्रमोद महाजन यांना स्मरण पत्र लिहून याबाबत खुलासा करण्याचे सांगितले आहे. याबाबत वारंवार प्रमोद महाजन यांना पत्र लिहून खुलासा करण्यास सांगितले असताना देखील प्रमोद महाजन हे खुलासा करत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी देखील वडगाव उपविभागीय कार्यकारी अभियंता विवेक सूर्यवंशी यांनी राजगुरुनगर कार्यकारी अभियंता यांना देखील कळवले आहे.
कामशेत विभागाचे महावितरण प्रमुख प्रमोद महाजन यांच्या बाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी असून नागरिकांशी उद्धट बोलणे, महावितरण कार्यालयात नागरिकांच्या समस्या न सोडवणे, अरेरावी करणे त्याचप्रमाणे चुकीच्या पद्धतीने नागरिकांना महावितरणचा महसूल बुडून कनेक्शन देणे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कामशेत मधील नागरिक करताना दिसत आहे.
कामशेत परिसर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये वाढती लोकसंख्या पाहता दिवसेंदिवस महावितरणचे अधिकारी व त्यांनी ठेवलेल्या काही कंत्राटी लोकांकडून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणचे अधिकारी कामशेत शहरातील नागरिकांना तसेच आजूबाजूच्या लगत असणाऱ्या गावातील रहिवाशांना जर नवीन कनेक्शन हवे असल्यास ते देण्यास विलंब करतात.
महावितरण चा महसूल बुडवून चुकीच्या पद्धतीने ग्राहकांना नवीन कनेक्शन देणाऱ्या महावितरणच्या अधिकारी प्रमोद महाजन यांच्यावर कारवाई कारवाई करावी, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे. कामशेत महावितरण कार्यालयामध्ये अनेक अनागोंदी कारभार चालू असल्याचे नागरिकांकडून कळत आहे. त्यामुळे या कार्यालयातील अधिकाऱ्याची चौकशी केल्यास अनेक बनावट कनेक्शन दिल्याचे समोर येऊ शकते अशी चर्चा नागरिक करत आहेत. त्यामुळे या कार्यालयाची व अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी याबाबत लवकरच कामशेत शहरातील नागरिक मावळचे आमदार सुनील शेळके व महावितरण चे अधिकारी यांना निवेदन देणार आहेत.( New Connection Given When Power Bill Is Outstanding Poor Management of Mahavitran Kamshet branch )
हेही वाचा – वडगाव शहराला ‘सुरक्षेच्या तिसऱ्या डोळ्याची’ गरज; भाजपा महिला मोर्चाचे नगरपंचायत आणि पोलिस प्रशासनाला निवदेन
प्रमोद महाजन (महावितरण शाखा कामशेत प्रमुख) : ग्राहकाची वीज बिलाची थकबाकी असताना त्याच जागी नवीन वीज कनेक्शन कोणी दिले याबाबत आपण माहिती घ्यावी व या संपूर्ण प्रकरणाची माहिती आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घ्यावी मी याबाबत काही बोलणार नाही
विवेक सूर्यवंशी (उपकार्यकारी अभियंता वडगाव मावळ) : ग्राहकाची वीज बिलाची थकबाकी असताना त्याच जागी नवीन जोडणी केल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले असल्याने यातून कंपनीच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचे दिसत आहे. तसेच कंपनीचा महसूल देखील बुडवला गेल्याचा दिसत असल्याने प्रमोद महाजन यांना खुलासा करण्यासाठी स्मरणपत्र पाठवण्यात आले असून त्यावर कारवाई करण्यासाठी कार्यकारी अभियंता राजगुरुनगर यांना देखील पत्र देण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– धोकादायकरित्या रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या ट्रकला दुचाकीची धडक; 2 दुचाकीस्वार ठार, मिंडेवाडीजवळील घटना
– येळसे गावातील तलाठी कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न! आमदार सुनिल शेळकेंच्या पाठपुराव्याला यश