मागील काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन आज (रविवार, दिनांक 28 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन समारंभाला भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री, विविध देशांचे प्रतिनिधी आणि इतर महत्वाची नेते मंडळी उपस्थित होती. परंतू, देशातील अनेक विरोधीपक्षांनी या उद्घाटनाला विरोध दर्शवत बहिष्कार घातला. ( New Parliament Building Inauguration )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनचे उद्घाटन आणि वास्तू पूजन झाले. कार्यक्रमाची सुरूवात सकाळी पूजा आणि होमहवन याने झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते संसदेत ऐतिहासिक सेंगोलची प्रतिष्ठापना केली गेली. पुजा हवन नंतर मोदी यांनी सेंगोल समोर दंडवत घातले, हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. ( PM Narendra Modi Unveils New Parliament Amid Opposition Boycott )
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते औपचारिकरित्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वधर्मीयांकडुन प्रार्थना करण्यात आली आहे. बौद्ध, जैन, पंजाबी, शीख, मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू आदी सर्वधर्म प्रार्थना सोहळा संसदेच्या नवीन इमारतीत पार पडला. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी यांच्यासह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदी नेते उपस्थित होते.
आज का दिन हम सभी देशवासियों के लिए अविस्मरणीय है। संसद का नया भवन हम सभी को गर्व और उम्मीदों से भर देने वाला है। मुझे पूर्ण विश्वास है कि यह दिव्य और भव्य इमारत जन-जन के सशक्तिकरण के साथ ही, राष्ट्र की समृद्धि और सामर्थ्य को नई गति और शक्ति प्रदान करेगी। pic.twitter.com/aOReN4JiF4
— Narendra Modi (@narendramodi) May 28, 2023
नवीन संसद भवनात लोकसभेतील 888 खासदारांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर राज्यसभेत 348 खासदारांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल 941 कोटी रुपये खर्च करुन हे नवीन संसद भवन उभारण्यात आले आहे. सकाळी झालेल्या या औपचारिक उद्घाटन प्रसंगानंतर दिवसभर या लोकार्पण सोहळ्यातील विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ( New Parliament Building Inauguration )
संपूर्ण कार्यक्रमाचे वेळापत्रक
– पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 7.15 वाजता विजय चौकात पोहोचणार
– महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ बांधलेल्या पंडालमध्ये सकाळी 7.30 वाजता पूजा
– सकाळी 8.30 वाजता पूजा समाप्त होणार
– सकाळी 8.30 नंतर पंतप्रधान इतर मान्यवरांसह चेंबरला भेट देणार
– सकाळी 9 ते 9.30 या वेळेत प्रार्थना सभा होणार
– सकाळी 9.30 नंतर पंतप्रधान प्रार्थना सभेसाठी रवाना होणार
– पाहुण्यांचे आगमन सकाळी 11.30 वाजता सुरू होणार
– दुपारी 12.00 वाजता पंतप्रधान मान्यवरांसह मंचावर पोहोचणार
– दुपारी 12.07 वाजता राष्ट्रगीत होणार
– दुपारी 12.10 वाजता उपराष्ट्रपतींचे भाषण होणार
– दुपारी12.33 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशासाठी दिलेला संदेश वाचला जाणार
– दुपारी 12.38 वाजता विरोधी पक्षनेते राज्यसभेला संबोधित करणार
– दुपारी 12.43 वाजता स्पीकर जनतेला संबोधित करतील
– पंतप्रधान मोदी दुपारी 1.05 वाजता 75 रुपयांचे नाणे जारी करतील
– पंतप्रधान मोदींचे भाषण दुपारी 1.10 वाजता सुरू होणार.
अधिक वाचा –
– पवनमावळात एसआरटी तंत्रज्ञान रुजवणारे कृषी सहाय्यक विकास गोसावी यांना ‘स्टार प्रचारक अधिकारी’ पुरस्कार
– मावळात वनविभागाला प्रथमच स्वतंत्र रेस्क्यू व्हॅन, अधिकारी-कर्मचारी आनंदित – पाहा व्हिडिओ
– पालखी सोहळ्याची पुणे जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी; पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा पुरविण्यावर विशेष भर