पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएच्या माध्यमातून सोमाटणे-परंदवडी रस्ता ते सोमाटणे गावठाण या रस्त्यासाठी 2 कोटी 91 लाख निधी उपलब्ध झाला आहे. शनिवारी (दि. 2) आमदार सुनिल शेळके आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ह्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
‘जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगतचे मोठे गाव म्हणून सोमटणे गावाची ओळख आहे. मोठे हॉस्पिटल्स, हॉटेल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, बँका यामुळे येथील बाजारपेठ वाढत आहे. गावातील नागरिकीकरण वाढत आहे. नागरिकांच्या पसंतीस उतरल्याने नव्याने भव्य गृहप्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे भविष्याचा विचार करुन गावाचा नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे. मुख्य रस्ते प्रशस्त झाले पाहिजेत. येथे येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. याच अनुषंगाने मागील चार वर्षात सोमाटणे गावासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. या निधीतून सोसायटीमधील अंतर्गत रस्ते,गावाला जोडणारे मुख्य रस्ते रुंदीकरण व डांबरीकरण केले आहेत. मोठी महसुली ग्रामपंचायत असलेल्या सोमाटणे गावाने बिनविरोध निवडणूक करुन गावाचा एकोपा जपला आहे. आणि विकासकामांसाठी निधी देखील गावात खेचून आणला आहे. यापुढील काळात देखील गावाच्या हितासाठी एकजुटीने कामे करा.’ असे आमदार सुनिल शेळके यावेळी म्हणाले. ( New Road at Somatne Village Bhoomi Pujan By MLA Sunil Shelke )
या समारंभाला आमदार शेळकेंसह तंटामुक्ती अध्यक्ष विष्णूभाऊ मुऱ्हे, बबुशा मुऱ्हे, सोपान मुऱ्हे, महेंद्र साठे, निवृत्ती मुऱ्हे, धनाजी मुऱ्हे, सोमाटणे सरपंच स्वाती कांबळे, उपसरपंच नितीन मुऱ्हे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, युवक अध्यक्ष किशोर सातकर, ग्रामपंचायत सदस्य विशाल मुऱ्हे, नवनाथ मुऱ्हे, राकेश मुऱ्हे, सचिन गायकवाड, शैलेश मुऱ्हे, धनश्री मुऱ्हे, अनिता मुऱ्हे, सोनाली गायकवाड, संध्या थोरात, वनिता मुऱ्हे, भरत भोते, सचिन मुऱ्हे, सोमनाथ वाघोले, राकेश घारे, अविनाश गराडे, अजय देशमुख, कमलेश मुऱ्हे, संजय बाविस्कर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– लोणावळ्यातील रामनगर भागात जबरी चोरी! एकाच रात्री तीन घरात घरफोडी, तब्बल 3 लाख 21 हजारांचा मुद्देमाल लंपास । Lonavala Crime News
– भाजपाच्या ग्राम परिक्रमा यात्रेचा मावळमधील उर्से गावातून शुभारंभ, काय आहे गाव परिक्रमा यात्रा? जाणून घ्या
– खुपच छान..! मावळ तालुक्यात तब्बल 40 हजार बालकांना पल्स पोलिओ डोस, आरोग्य विभागाचे परफेक्ट नियोजन