न्यूझीलंड देशाच्या महिला पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी त्यांच्या प्रधानमंत्री पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. तसेच आपण राजकारणातूनही निवृत्ती घेत असल्याचे जेसिंडा अर्डन यांनी सांगितले असून त्यांच्या घोषणेने देशात एकच खळबळ माजली आहे. राजीनाम्याची घोषणा केली तेव्हा जेसिंडा या अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ( New Zealand PM Jacinda Ardern Shocking Resignation Announcement )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“माझ्यात आता काम करण्याची उर्जा राहिली नाहीये. त्यामुळे आता राजीनामा देण्याची वेळ आली आहे. मी माझे पद सोडत आहे, कारण अशा विशेष भूमिकेसोबत अनेक जबाबदाऱ्या येतात. नेतृत्व करण्यासाठी तुम्ही योग्य व्यक्ती कधी आहात आणि कधी नाही हे जाणून घेण्याची जबाबदारी तुमचीच असते. यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, हे मला माहिती आहे. पण आता ही जबाबदारी पार पाडण्याइतकी ताकद माझ्यात उरलेली नाही हे मला समजले आहे,’ असे सांगत जेसिंडा अर्डन यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. पक्षाच्या वार्षिक बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली.
जेसिंडा या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान होत्या. त्यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ 7 फेब्रुवारीनंतर संपणार होता. तसेच त्यांनी पंतप्रधान म्हणून साडेपाच वर्षांचा कार्यकाळही पूर्ण केला आहे. 2017 मध्ये त्या फक्त न्यूझीलंडच्या नाही तर, जगातील सर्वात तरुण महिला पंतप्रधान म्हणून पदावर विराजित झाल्या होत्या.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 9 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू
– मोठी बातमी! तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूकांसह कसबा पेठ, पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकांचीही घोषणा