मावळ तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन कार्यात सक्रीय असणारे वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना निनावी धमकीचा फोन आल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. याबाबत निलेश गराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
बुधवारी (दि. 29) सायंकाळी सहाच्या दरम्यान गराडे यांना अज्ञात व्यक्तीकडून, तुम्ही बुडालेल्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढण्यास उशीर केल्याने आमचा माणूस पाण्यात बुडून मेला, असे म्हणत शिवीगाळ करून धमकी दिली गेली. कासारसाई धरण येथे घडलेल्या अपघातनंतर हा प्रकार घडला. ( Nilesh Garade of Vanyjiv Rakshak NGO received threatening call from unknown persons )
निलेश गराडे हे वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक आहेत. मावळ तालुक्यात तसेच परिसरात कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर बचाव कार्यासाठी त्यांना आणि त्यांच्या टीमला तातडीने बोलावले जाते. ते देखील वेळेत पोहोचून तिथे मदतकार्य करतात. परंतू एखाद्या घटनेत काहीकारणास्तव विलंब झाल्यास असे फोन येत असतील, तर आम्ही काम कसे करावे, असा सवाल त्यांनी केला आहे. गराडे यांना याप्रकरणी सोशल मीडियावर पाठींबा मिळत आहे.
अधिक वाचा –
– मावळमध्ये ‘हिट अँड रन’चा प्रकार ! तळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांची दोन वाहनांना धडक, बेजबाबदारपणे घटनास्थळावरून पळाले
– कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपली… वडगाव शहरातील 42 आदिवासी कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप । Vadgaon Maval
– महिलेचा विनयभंग करुन फरार झालेल्या ओला कॅब चालकाच्या मुसक्या आवळण्यात देहूरोड पोलिसांना यश । Dehu Road Crime