Dainik Maval News : पुणे जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी – पुणे जिल्हा तर्फे विविध पोलrस ठाण्यांना भेट देण्यात आली. या भेटीत शाळा आणि कॉलेज परिसरात गस्त वाढवण्यासह सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
- यात देहूरोड, वडगाव, कामशेत, तळेगाव दाभाडे, परंदवाडी आणि लोणावळा पोलिस ठाण्यांना भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासंदर्भात मागण्या मांडण्यात आल्या.
यावेळी मावळ तालुका अध्यक्ष अनुप भेगडे, पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील, महाराष्ट्र सल्लागार अॅड. संपतराव फड, पुणे जिल्हा IT सेल प्रमुख मनोहर गवळे – माळी ,किसन नागपाल आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
निर्भय महाराष्ट्र पार्टीने पोलिस प्रशासनासोबत समन्वय साधून तरुणांमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश

