Dainik Maval News : मावळ तालुक्यात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे रूग्ण आढळून आलेले नाहीत. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शॅरन सोनवणे यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यात जीबीएसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शॅरन सोनवणे यांनी मावळ तालुक्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पत्र पाठवून गावात जनजागृती करून उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- जीबीएस बाबत अफवा पसरविणे टाळावे आणि आरोग्य अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला जीबीएसची लक्षणे आढळली तर ताबडतोब नजीकच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन मावळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ सोनावणे यांनी केले आहे.
या उपाययोजना करा
1. पाणी उकळून प्यावे
2. भाज्या आणि फळे पूर्णपणे धुवून घ्याव्यात
3. मांस व्यवस्थित शिजवा. कच्चे किंवा कमी शिजलेले अन्न, विशेषतः अंडी आणि समुद्री खाद्यपदार्थ टाळावे
4. खाण्यापूर्वी आणि स्वच्छतागृहाचा वापरल्यानंतर साबण व पाण्याने हात धुवावा.
5. कच्चे आणि शिजविलेले अन्न वेगळे ठेवा. कच्चे मांस हाताळल्यानंतर स्वयंपाक घरातील पृष्ठभाग आणि भांडी
निर्जंतुक करावा
6. पाय किंवा हातांमध्ये अचानक कमजोरी. चालण्यास त्रास होणे किंवा सुन्न होणे. सततचा अतिसार विशेषतः जर रक्ताळलेला असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या
जीबीएस आजाराचा मवाळ तालुक्यात अद्याप प्रादुर्भाव झालेला नाही. हा बरा होणारा आजार असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. – कुलदीप प्रधान, प्रशासक तथा गटविकास अधिकारी, मावळ पंचायत समिती
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ