नुकताच पावसाळा सुरु झाला आहे. मुसळधार पाऊस व मावळातील निसर्ग सौंदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करत असते. त्यातीलच एक नाव म्हणजे शेलारवाडी नजीक असणारे कुंडमळा हे ठिकाण.
या ठिकाणी पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील तसेच अनेक भागातून पर्यटक नागरिक निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात. परंतू कुंडमळा हे ठिकाण अतिशय धोकादायक असून त्या ठिकाणी नवीन आलेल्या पर्यटकांना पाण्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या आहेत. ( notice boards have been put up at kundmala through talegaon dabhade police station )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शनिवारी (दिनांक 1 जुलै 2023) रोजी सायंकाळी साडे सहा वाजता तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणार्या कुंडमळा येथे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या वतीने इंद्रायणी नदीपात्रातून उतरून कोणीही फोटो काढू नये, सेल्फी काढू नये, तसेच हे ठिकाण धोकादायक असून याठिकाणी अनेक व्यक्तींचा बुडून मृत्यू देखील झालेला आहे, अशा आशयाचे बोर्ड लावण्यात आले आहे.
त्यावेळेस तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांच्या समवेत उपनिरीक्षक मारुती मदेवाड ,पोलीस नाईक प्रशांत वाबळे, पोलीस नाईक किसन कोळप , पोलीस कॉन्स्टेबल बाबाराजे मुंडे उपस्थित होते. यावेळी उपस्थित पर्यटकांना पोलिसांमार्फत सदर ठिकाणी इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये वाढ झाली आहे. तसेच नागरिकांना होणारा धोका याबाबत देखील मार्गदर्शन करून सूचनांचे पालन करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– समृद्धी महामार्गावर अग्नीतांडव! पुण्याला निघालेल्या बसचा बुलढाण्यात भीषण अपघात, 25 जणांचा आगीत होरपळून मृत्यू
– हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मावळ पंचायत समिती सभागृहात प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान