मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात झाली. त्यात निवडणूकीतील दैनंदिन खर्च तपासणीत श्रीरंग आप्पा चंदू बारणे, संजोग भिकू वाघेरे पाटील आणि माधवी नरेश जोशी या तीन उमेदवारांच्या खर्चात तफावत आढळून आली आहे. त्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी त्यांना नोटीस दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नोटीसमध्ये नमूद केले आहे की, 33-मावळ लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुक, 2024 च्या अनुषंगाने उमेदवाराने किंवा त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीने निश्चित केलेल्या दिवशी निवडणुक खर्चाची नोंदवही व प्रमाणके तपासणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार आपले प्राधिकृत प्रतिनिधी मार्फत उमेदवाराचा खर्च निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे तपासणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला होता. या खर्चाची तपासणी केली असता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने नोंदविलेल्या शॅडो रजिस्टरसोबत तुलना करता खरा व योग्य वाटत नाही, अथवा खर्चाचा काही भाग समाविष्ठ करण्यात आलेला नाही असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच निदर्शनास आलेली तफावत़ीची रक्कम देखील नोटीसमध्ये नमूद केली गेली आहे. ( notices issued to Shrirang Barane Sanjog Waghere regarding discrepancies in expenses Maval Lok Sabha )
अमान्य तफावतीबाबत सदरची नोटीस प्राप्त झाल्यापासून 48 तासांच्या आत आपला खुलासा सादर करावा व पुढील दुसऱ्या तपासणीच्या वेळी सदर निवडणूक खर्चाचे 33 मावळ लोकसभा मतदारसंघ, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष येथे न चुकता सादर करावेत. विहीत मुदतीत आपले म्हणणे प्राप्त न झाल्यास नोटीसमधील नमुद खर्च आपणांस मान्य आहे, असे गृहीत धरुन आपल्या निवडणुक खर्चामध्ये समाविष्ट करण्यात येईल. असे नोटीशीत आहे.
निवडणूकीतील दैनंदिन खर्चाचे लेखी तपासणीकरीता उपलब्ध करून न दिल्याबाबत मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीतील 6 उमेदवारांना नोटीस बजावली आहे. यामध्ये शिवाजी किसन जाधव, सुहास मनोहर राणे, इन्द्रजीत धर्मराज गोंड, इकबाल इब्राहिम नावडेकर, लक्ष्मण सदाशिव अढाळगे, अजय हनुमंत लोंढे या उमेदवारांनी निवडणूकीतील दैनंदिन खर्चाचे लेखे तपासणीकरीता उपलब्ध करून दिले नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– “मावळच्या विकासासाठी संजोग वाघेरे यांच्याशिवाय पर्याय नाही”, वाचा कोणी म्हटलंय असं… । Maval Lok Sabha
– दुर्दैवी ! गावी आलेल्या आत्याचा अपघाती मृत्यू, शिरगाव-कासारसाई रस्त्यावरील घटना, अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा
– आंबी येथे पोलिसांच्या छाप्यात 5000 लीटर गावठी दारूचे रसायन जप्त, एकावर गुन्हा दाखल । Maval Crime