Dainik Maval News : राज्यातील कार्यरत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच ग्रामविकास विभागाने राज्यातील ग्रामपंचायतींना 15 लाख रूपयापर्यंतची विकासकामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
सदर निर्णयामुळे ज्या ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न 75 हजार रूपयांपर्यंत आहे, त्या ग्रामपंचायतींना 10 लाख रूपयांपर्यंतची. ज्या ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न 75 हजारापेक्षा जास्त आहे, त्या ग्रामपंचायतींना 15 रुपये लाखापर्यंतची कामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करता येतील. या निर्णयाची अंमलबजावणी करताना 10 लाखांच्यावरील कामाकरिता ई-निविदा पद्धतीचा अवलंब करणे अनिवार्य आहे.
ग्रामविकास विभागाने ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील घरकुले विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तरावरील कार्यरत असणाऱ्या कंत्राटी व बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी व कामे गतीने पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मानधनामध्ये 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुसळधार पावसाचा इशारा.. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी ; मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल
– खोपोलीतील झेनिथ धबधबा येथे वर्षा विहारासाठी गेलेल्या तरुणीचा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू । Khopoli News
– पूररेषेत बांधकामे होत असताना डोळेझाक प्रशासनाने केली, त्याची शिक्षा सर्वसामान्य गरिबांना का? – खासदार श्रीरंग बारणे । Pimpri Chinchwad News