Dainik Maval News : पुणे जिल्ह्यात कोणत्याही खासगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करताना त्याची पूर्व माहिती सात दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत.
पुणे जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याचा धोका नाकारता येत नाही. तसेच दौंड, बारामती, शिरुर तालुक्याच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाळू माफिया देखील टेहळणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ड्रोनच्या मध्यमातून टेहाळणी करून इतर प्रकारच्या चोऱ्याही होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. आदेशाचा भंग करून पोलिसांच्या परवानी शिवाय कोणताही व्यक्ती ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करताना आढळून आल्यास अशी व्यक्ती भारतीय न्याय संहितेचे कलम 233 प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– येत्या तीन ते चार महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकेच्या निवडणुका होणार !
– बाजार समितीवर कुणाची सत्ता राहणार ? मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची नव्याने निवड होणार
– राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले ! पक्षाची कोअर कमिटी जाहीर , आमदार सुनील शेळके यांचा समावेश । Maval News