व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवड येथील ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमाचे अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन ; ‘डीपीडीसी’च्या माध्यमातून दिव्यांगांसाठी निधीची तरतूद करणार

पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या वतीने १७ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत मोरवाडी येथील ऑटो क्लस्टर मैदानावर ‘पर्पल जल्‍लोष’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 18, 2025
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
DCM Ajit Pawar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : ‘दिव्यांग बांधव हा समाजाचा अविभाज्य घटक असून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम शासन करेल. त्यासाठी विविध घटकांच्या सहकार्याने प्रभावी उपायोजना करण्यात येतील,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

दिव्‍यांग बांधवांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणून त्‍यांचे सक्षमीकरण करण्‍याच्‍या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या वतीने १७ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत मोरवाडी येथील ऑटो क्लस्टर मैदानावर ‘पर्पल जल्‍लोष’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला आ. उमा खापरे, आ. अण्णा बनसोडे, आ. अमित गोरखे, केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख उपस्थित होते.‌

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्याच्या लोकसंख्येच्या साधारणपणे पाच टक्के लोकसंख्या दिव्यांग बांधवांची आहे. दिव्यांग बांधवांसाठीच्या योजना राबवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ठराविक निधी हा दिव्यांगांसाठी खर्च करण्याबाबतचा निर्णय शासन पातळीवर घेण्यात येईल. यासंबंधीचे आदेश देखील आदेश लवकर काढले जातील. राज्याचा अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांच्या विविध योजनांसाठी तरतूद केली जाईल. दिव्यांग व्यक्तींची संख्या किती आहे, यासाठी जिल्हानुसार दिव्यांगांचा आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

ससून रुग्णालयात दिव्यांगांचे प्रमाणपत्र मिळणार
पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात दिव्यागांना प्रमाणपत्र दिले जात आहे त्याच धर्तीवर ससून रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात देखील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येतील, यासाठी आवश्यक ते निर्देश देण्यात येतील अशी घोषणा श्री. पवार यांनी यावेळी केली.

प्रदर्शनातील स्टॉलला उपमुख्यमंत्र्यांनी दिली भेट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनातील दिव्यांगांच्या उपयोगाच्या स्वयंसेवी संस्थांच्या स्टॉलला भेट दिली. प्रदर्शनात ४० पेक्षा जास्त स्टार्टअप्स,कार्पोरेट कंपन्यानी दिव्यांगांसाठीच्या निर्मिती केलेल्या नवनवीन वस्तू पाहण्यास मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदर्शनास सर्वांनी भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– येत्या तीन ते चार महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकेच्या निवडणुका होणार !
– बाजार समितीवर कुणाची सत्ता राहणार ? मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची नव्याने निवड होणार
– राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले ! पक्षाची कोअर कमिटी जाहीर , आमदार सुनील शेळके यांचा समावेश । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

आता कोणत्याही कार्यक्रमावेळी ड्रोन वापरण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक, अन्यथा थेट तुरुंगवास । Pune News

Next Post

एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था ; पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर सीएम श्री शाळा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Presentation of 100 day plan of school education department cm Devendra Fadnavis Minister Dada Bhuse

एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था ; पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर सीएम श्री शाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.