Dainik Maval News : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात इयत्ता चौथीमध्ये सार्थक भोजने, सातवीमध्ये आरुषी केवट, नववीमध्ये समृद्धी काळे आणि इयत्ता अकरावीमध्ये ऋतुजा गोदासे यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेला एकूण १२९१ विद्यार्थी बसले होते.
शिक्षणमहर्षी कृष्णराव भेगडे व संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांच्या संकल्पनेतून गेली तीन वर्षांपासून ही परिक्षा घेतली जात आहे. संस्थेचे अध्यक्ष बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, राजेश म्हस्के, नंदकुमार शेलार, दामोदर शिंदे, यादवेंद्र खळदे, महेशभाई शहा, विनायक अभ्यंकर आणि प्रकल्प सहप्रमुख सोनबा गोपाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांमधून इयत्ता चौथी, सातवी, नववी व अकरावीच्या वर्गातील प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि २ उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले. तसेच शाळानिहाय प्रथम क्रमांक काढण्यात आले आहेत. ही परीक्षा एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर घेतली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तोंड ओळख होते, असे संतोष खांडगे यांनी सांगितले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.
सर्व परीक्षेचे निकाल
इयत्ता ४ थी निकाल
प्रथम : भोजने सार्थक विजय
द्वितीय: होणमाने स्वरूप सुभाष
तृतीय: डोलारे आरुष किरण
हे विद्यार्थी पैसाफंड प्राथमिक शाळेतील आहेत.
इयत्ता ७ वी निकाल
१ केवट आरुषी रामशंकर
(प्रगती विद्या मंदिर)
२सुरशे तृप्ती नामदेव (ॲड पु. वा. परांजपे विद्या मंदिर)
३ जाधव मंजिरी जयदीप
(नवीन समर्थ विद्यालय)
इयत्ता ९ वी निकाल
१ काळे समृद्धी राहुल
(श्री एकवीरा विद्या मंदिर)
२ पैठणे रुतुजा अरविंद
(श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर)
३ चवरे संचिता मनोज
(श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर कान्हे)
इयत्ता ११ वी निकाल
१ गोदासे ऋतुजा रुपेश
(नवीन समर्थ विद्यालय व ज्युनियर कॉलेज)
२ भोटे इशान रविंद्र
(पवना ज्युनियर कॉलेज)
३ हरिश्चंद्रे शुभम अरुण
(नवीन समर्थ विद्यालय च ज्युनियर कॉलेज)
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link