महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत येत असलेल्या मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी (दि. 4 ऑक्टोबर) संपन्न झाली. यावेळी आमदार सुनिल शेळकेंनी मावळ तालुक्यातील कामशेत-खडकाळा, डोणे-आढले, कार्ला, पाटण, कुसगाव-डोंगरगाव, वराळे या प्रादेशिक योजनांची सद्यस्थिती प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडली.
सदर योजना पुर्ण करण्यासाठी अनेक वेळा बैठका घेण्यात आल्या आहेत. परंतू कामांना गती मिळत नाही. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सर्व योजना पुर्ण करणे आवश्यक आहे. वनविभागाच्या काही अडचणी असतील तर त्याचा पाठपुरावा करुन मार्ग काढावा. सर्व योजना लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. दिलेल्या कालावधीत जर योजना पूर्ण झाल्या नाहीत तर संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
बैठकीला आमदार शेळकें समवेत, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, मुख्य अभियंता पुणे राजेश रहाणे, शाखा अभियंता राजेश कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पी. सी. भांडेकर, अधिक्षक अभियंता वैशाली आवटे तसेच सरपंच, सदस्य, ठेकेदार आदी मान्यवर उपस्थित होते. ( Officer level meeting concluded for water supply schemes in Maval taluka in presence of mla sunil shelke at mumbai )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पंतप्रधान मोदींच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात वडगाव शहर भाजपाचा सक्रीय सहभाग; 7 टन कचरा संकलित
– मावळ तालुक्यातील 19 गावांच्या सार्वत्रिक आणि 10 गावांच्या पोटनिवडणूकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; वाचा 29 ग्रामपंचायतींची यादी
– अजितदादांनी बाजी मारली! उपमुख्यमंत्री, अर्थमंत्रीपदानंतर पुण्याचे पालकमंत्री पदही ताब्यात, चंद्रकांतदादा ‘या’ जिल्ह्याचे पालक