Dainik Maval News : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना यूपीएस योजना लागू करण्याबाबत घोषणा केल्यामुळे राज्यातील बहुसंख्य कर्मचारी, अधिकारी संघटनांनी कामबंद आंदोलन स्थगित केले आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास विभागातील महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकाऱ्यांना शासनाच्या अधिनियमानुसार राज्य शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा दिलेला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्यास नगर विकास विभागाने सुद्धा दुजोरा दिलेला आहे. त्यानुसार सदर अधिकाऱ्यांना सेवार्थ आयडी देणे बाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे गेला असता वित्त विभागाने सदर अधिकारी शासकीय कर्मचारी नसल्याबाबतची त्रुटी काढून राज्यातील अंदाजे ३००० संवर्ग अधिकाऱ्यांना सेवार्थ आयडी पासून वंचित ठेवले. या अधिकाऱ्यांपैकी बरेच अधिकारी २०१०-२०१२ पासून कार्यरत असून अद्याप पर्यंत त्यांना जुनी पेन्शन, नवी पेन्शन यापैकी कुठल्याही पेन्शन योजनेची अंमलबजावणी झालेली नाही.
सोबत नगरपरिषदचे स्थानिक कर्मचारी यांना सुद्धा पेन्शन लागू नाही. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांचे भवितव्य अंधःकारात असल्यामुळे महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने आपले काम बंद आंदोलन स्थगित न करता, सेवार्थसह पेन्शन योजनेचे पर्याय दिल्याशिवाय बेमुदत काम बंद आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे ठरविले आहे. त्यानुसार वडगाव नगर पंचायतीच्या कार्यालयातील सर्व संवर्ग अधिकारी आणि नगर पंचायत कर्मचारी यांनी शंभर टक्के काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
अधिक वाचा –
– ‘केवळ आठ महिन्यात पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे’, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन । Maval News
– वडगाव येथे सकल हिंदू समाज मावळ यांचा ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ । Vadgaon Maval
– मुंबईतील गोविंदा पथकाने फोडली ‘मावळ गर्जना’ प्रतिष्ठानची दहीहंडी । Vadgaon Maval