पीएमपीएमएल ( PMPML )प्रशासनाकडून पीएमआरडीए क्षेत्रातील सुमारे 40 मार्ग बंद केले जाणार आहे. तोट्यात असणाऱ्या या मार्गांवर खासगी वाहतूकदारांच्या बस धावत असे. खेर पीएमपीचे व्यवस्थापकीये संचालक ओमप्रकाश बकोरिया ( Omprakash Bakoria ) यांनी ते 40 मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील 142 गाड्यांचे 1200 मार्ग बंद होत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटीची सेवा सुरु झाल्यानंतरच पीएमपीची सेवा बंद केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ( Omprakash Bakoria Decision To Close PMPML 40 Routes In PMRDA Area )
ग्रामीण भागातील 40 मार्गांवरील पीएमपीची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टप्याटप्प्याने याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती पीएमपीएमएल मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी दिली.
बससेवा बंद करु नये.. स्थानिक स्तरातून होतेय मागणी
ग्रामीण भागातील काही मार्ग बंद करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला. या निर्णयाचा विरोध होताना दिसत आहे. या मार्गात लोणावळा बससेवेचाही समावेश आहे. येथील विद्यार्थी, नागरिक, व्यापारी आदींसाठी पीएमपी बससेवा अत्यंत महत्वाची आहे. अशात बसेस बंद झाल्याने त्याचा तोटा थेट सामान्यांना सहन करावा लागेल, त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाने तोट्याचा विचार करत असताना मुळ कारणाचा शोध घ्यावा, मात्र सेवा बंद करु नये अशी मागणी स्थानिक स्तरातून होत आहे.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील अवैध दारूधंद्यावर कारवाईचा बडगा सुरुच, पोलिसांची अनेक ठिकाणी छापेमारी
– Video : वडगाव मावळमध्ये जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा, खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद