Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषद हद्दीतील दिव्यांग नागरिकांना प्रत्येकी 30 हजार रुपये दिव्यांग भत्ता मिळणार आहे. लोणावळा, खंडाळ्यातील एकूण 238 दिव्यांगाची नगरपरिषदेच्या वतीने नोंदणी करण्यात आली आहे. या दिव्यांगाना 71 लाख 40 हजार रुपये खर्चास मंजुरी मिळाली आहे. प्रत्येक दिव्यांगास प्रत्येकी 30 हजार रुपये याप्रमाणे निधी त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
- महाराष्ट्र शासनाने सूचित केलेल्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत लोणावळा नगरपरिषद कार्यालयात दिव्यांग निधी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात या उपक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.
यावेळी लोणावळा नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी संतोष खाडे, तसेच पत्रकार विशाल पाडाळे, विशाल विकारी, संजय पाटील, सुनील म्हस्के, सागर शिंदे यांची उपस्थिती होती. लेखा विभागाचे निलेश काळे, सतिश गावडे, दिव्यांग निधी विभागाच्या सुनिता जाधव, सहायक ग्रंथपाल विजय लोणकर, कर्मचारी बबन कांबळे, अनंता टेमघरे यांनीही सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र राऊत यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मिसिंग लिंक झाला, आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याचा प्लॅन ; एमएसआरडीसीकडून सरकारला प्रस्ताव । Mumbai Pune Expressway
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पुणे जिल्ह्यातील 146 किमी पाणंद रस्ते मोकळे, मावळमधील 23.8 किमी पाणंद रस्ते मोकळे
– कामाची बातमी : भूमिअभिलेख विभागाकडून गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध, असा चेक करा तुमच्या गावचा नकाशा