व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade

तळेगाव वाहतूक विभागाच्या हद्दीत श्री डोळसनाथ महाराज यात्रा उत्सव हा रविवार, दिनांक ३० एप्रिल ते गुरुवार, दिनांक ३ एप्रिल २०२५ या कालावधीत साजरा होत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 31, 2025
in शहर, लोकल
Major changes in traffic in Dehugaon area on occasion of Sant Tukaram Maharaj Bij ceremony

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने शहरातील वाहतूक मार्गातील बदलाबाबत आदेश दिले आहेत.

तळेगाव वाहतूक विभागाच्या हद्दीत श्री डोळसनाथ महाराज यात्रा उत्सव हा रविवार, दिनांक ३० एप्रिल ते गुरुवार, दिनांक ३ एप्रिल २०२५ या कालावधीत साजरा होत आहे. यादरम्यान श्री डोळसनाथ महाराज मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येणार असून मंदिर परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकाळात वाहतूक कोंडी न होता वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिले आहेत.

वाहतूक मार्गात केलेले बदल
1. जिजामाता चौकातून डोळसनाथ मंदिराकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी
पर्यायी मार्ग – मारुती मंदिर चौक – नगर परिषद इमारती समोरून – संभाजी नगर – नालबंदी गल्ली – गणपती चौक मार्गे पुढे इच्छित स्थळी
2. सुभाष चौकाकडून डोळसनाथ मंदिराकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी
पर्यायी मार्ग – मारुती मंदिर चौक – नगर परिषद इमारती समोरुन – संभाजी नगर – गणपती चौक मार्गे पुढे इच्छित स्थळी
3. घोरवाडी रेल्वे स्टेशनकडून गणपती चौक मार्गे जिजामाता चौक व डोळसनाथ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी
पर्यायी मार्ग – गणपती चौक (डावीकडे वळून) – नालबंदी गल्ली – संभाजी नगर – नगर परिषद इमारती समोरून – मारुती मंदिर चौक मार्गे पुढे इच्छित स्थळी

वाहतूक मार्गातील हे बदल रविवार (दि.३०) सकाळी सहा वाजल्यापासून ते गुरुवार (दि.३) रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहेत. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन तळेगाव वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मिसिंग लिंक झाला, आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याचा प्लॅन ; एमएसआरडीसीकडून सरकारला प्रस्ताव । Mumbai Pune Expressway
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पुणे जिल्ह्यातील 146 किमी पाणंद रस्ते मोकळे, मावळमधील 23.8 किमी पाणंद रस्ते मोकळे
– कामाची बातमी : भूमिअभिलेख विभागाकडून गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध, असा चेक करा तुमच्या गावचा नकाशा


Previous Post

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने दिव्यांग नागरिकांना प्रत्येकी 30 हजार रुपये दिव्यांग भत्ता मिळणार । Lonavala News

Next Post

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात ८६ हजार वाहनांची नोंदणी ; पुणे परिवहन कार्यालय अंतर्गत सर्वाधिक ११ हजार वाहनांची नोंदणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
86 Thousand vehicles registered in maharashtra on Gudi Padwa 30 percent more than last year

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात ८६ हजार वाहनांची नोंदणी ; पुणे परिवहन कार्यालय अंतर्गत सर्वाधिक ११ हजार वाहनांची नोंदणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

May 11, 2026
Jail-And-Court

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

May 11, 2026
woman died after falling from eighth floor incident at Katvi in ​​Vadgaon Maval area

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

May 11, 2026
Neelam Gorhe held an administration meeting regarding rape of a minor girl in Pawana Dam area ​​Lonavala

लोणावळा ग्रामीण हद्दीत पवना डॅम परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली प्रशासनाची बैठक

May 11, 2026
Sainath Varghade from Ardav Maval has passed 10th exam after 26 years by solving English subject

‘इंग्रजी’ भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे ‘साईनाथभाऊ’ झाले दहावी पास

May 10, 2026
Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.