व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा

आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने मावळ तालुक्यातील ७१ गावांमधील ३६०० विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सुविधा

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 22, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
On initiative of MLA Sunil Shelke free bus facility for class 10th students of Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत आणि विनासायास पोहोचता यावे, यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने ‘मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन’च्या वतीने मोफत वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम सन २०१६-१७ पासून सुरू असून यंदा नवव्या वर्षात पदार्पण करत आहे. यंदाच्या परीक्षेसाठी ३,६०० हून अधिक विद्यार्थ्यांना या सेवेचा लाभ मिळणार आहे.

  • इंदोरी, बोरवली, पवनानगर, जांभूळ, ब्राह्मणवाडी, तुंग, निगडे, आंबळे, घोलपवाडी, कदमवाडी, गोळेवाडी, मंगरूळ, निळशी, कुसुर, कुसवली, पवळेवाडी, कल्हाट, भोयरे, कशाळ, सावळा, सांगवी, शिवणे, डोणे, ओवळे, थोरण, वडेश्वर, धनगव्हाण, वारू, कोथुर्णे, मळवंडी, बौर, ओझर्डे, पिंपळवळी, पाथरगाव, कार्ला, अजिवली, वराळे, साई, नवीन उकसान, नाणे, सोमाटणे, बेबेडओहोळ, परंदवडी, शिरगाव, गोडुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे, दारुंब्रे, भोयरे, सुदुंब्रे, आढले बुद्रुक, करुंज, निगडे, देवघर, उकसान आदी ७१ गावांमधील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्या-येण्यासाठी मोफत प्रवास व्यवस्था करण्यात आली आहे.

१४ परीक्षा केंद्रांवर ७,०४७ विद्यार्थी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला मावळ तालुक्यातील १४ परीक्षा केंद्रांवर एकूण ७,०४७ विद्यार्थी बसणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहतूक सेवा उपयुक्त ठरणार आहे.

परीक्षा केंद्रे आणि त्यातील विद्यार्थीसंख्या पुढीलप्रमाणे:
– रामभाऊ परूळेकर विद्यानिकेतन, तळेगाव दाभाडे – १०६२ विद्यार्थी
– ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर, तळेगाव दाभाडे – ७१२ विद्यार्थी
– श्री शिवाजी विद्यालय, देहूरोड – २८९ विद्यार्थी
– संत तुकाराम विद्यालय, देहूगाव – ५८५ विद्यार्थी
– सेंट ज्युड हायस्कूल, देहूरोड – ४६९ विद्यार्थी
– न्यू इंग्लिश स्कूल, वडगाव मावळ – ७७६ विद्यार्थी
– फोर एस इंग्लिश मीडियम स्कूल, देहगांव – ३०४ विद्यार्थी
– पवना विद्यामंदीर, पवनानगर – ४४१ विद्यार्थी
– पंडीत नेहरु विद्यालय, कामशेत – ६०४ विद्यार्थी
– डॉ. बी. एन. पुरंदरे विद्यालय लोणावळा – ३५२ विद्यार्थी
– न्यू इंग्लिश स्कूल, चांदखेड – ३२८ विद्यार्थी
– ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल, लोणावळा – ६८४ विद्यार्थी
– ऑक्झीलिअम कॉन्व्हेंट हायस्कूल, लोणावळा – ३६६ विद्यार्थी
– संपर्क ग्रामीण विद्याविकास केंद्र भांबर्डे – ७५

प्रवास सुविधेची गरज का?
मावळ तालुक्यातील अनेक विद्यार्थी दुर्गम भागांतून येतात. परीक्षेच्या काळात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बससेवा मर्यादित असल्याने तसेच अवैध प्रवासी वाहतुकीच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रांवर पोहोचणे कठीण होते. ही गरज लक्षात घेऊन आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घेतला आणि ‘घर ते परीक्षा केंद्र’ मोफत प्रवास सेवा सुरू केली.

विद्यार्थ्यांसाठी मोलाची सोय
सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता येईल आणि परीक्षा संपल्यानंतर घरी परतणे सोयीचे होईल. गेल्या नऊ वर्षांपासून चालू असलेल्या या सेवेमुळे पालक आणि विद्यार्थी समाधान व्यक्त करत आहेत.

  • या उपक्रमामुळे तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळत आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

विद्यार्थ्यांसाठी ही मोफत सेवा उपयुक्त ठरणार असून, या उपक्रमामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मानसिक शांती मिळेल आणि परीक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल.

“विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी शिक्षणासोबतच त्यांना आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे आहे. ही मोफत वाहतूक सेवा विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू केली असून, भविष्यातही ती सुरू राहील.” – आमदार सुनील शेळके

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश 


Previous Post

देहूरोड येथील गोळीबार प्रकरणातील चार आरोपींना अटक । Maval Crime

Next Post

नागरिकांचा पैसा व वेळ वाचणार, चिंचवड पोस्टला मुख्य टपाल कार्यालयाचा दर्जा ; खासदार बारणेंच्या पाठपुराव्याला यश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chinchwad East Sub Post Office has been included in the Head Post Office

नागरिकांचा पैसा व वेळ वाचणार, चिंचवड पोस्टला मुख्य टपाल कार्यालयाचा दर्जा ; खासदार बारणेंच्या पाठपुराव्याला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Santosh Raut elected as chairman of public health committee of primary health center in Yelse

येळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जन आरोग्य समिती अध्यक्षपदी संतोष राऊत यांची निवड

March 29, 2026
Pune Rural Police Force achieves huge success in e-Governance 150 Days program

पुणे ग्रामीण पोलीस दलाला ई-गव्हर्नन्स १५० दिवस कार्यक्रमात घवघवीत यश ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा गौरव

March 29, 2026
Lonavala Municipal Council Chief Officer cabin opened on orders of District Magistrate

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उघडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन ; लोणावळा नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांचे मनोमिलन

March 28, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड ! पाहा सर्व विषय समित्यांची यादी

March 28, 2026
PM-Rahat scheme for road accident victims Immediate cashless treatment relief of up to one and half lakh rupees

PM-RAHAT : रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी ‘पीएम-राहत’ योजना : अपघातग्रस्तांना तात्काळ दीड (१.५०) लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचाराचा दिलासा

March 28, 2026
school

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेअंतर्गत ४०५ शाळा विकसित करण्यास राज्य शासनाची मंजूरी

March 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.