महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असतो. यंदा ईर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून त्या पैशातून गरजूंना मदत करा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्याच पार्श्वभूमीवर वडगाव मावळ शहरात मोरया प्रतिष्ठान ह्यांच्याकडून वडगाव नगरपंचायतच्या कर्मचारी बांधवांना रेनकोट आणि बूट चे वाटप करण्यात आले. ( On Occasion Of Deputy CM Ajit Pawar Birthday Raincoats And Monsoon Boots Distributed By Morya Pratishthan In Vadgaon Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून “मदत नव्हे कर्तव्य” ह्या सामाजिक बांधिलकीतून नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने वडगाव नगरपंचायत मधील सर्व कर्मचारी बांधवांना शनिवारी रेनकोट व बूट भेट देण्यात आले. वडगाव शहरातील नागरिकांना सदैव तत्परतेने सेवा पुरविणारे आरोग्य व पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी बांधव खूप मोलाची भूमिका बजावत असतात. पावसाळ्याचे दिवस असल्याने रेनकोट व बूट वाटप करण्यात आल्याने कर्मचारी बांधवानी समाधान व्यक्त करत नगराध्यक्ष मयूर ढोरे आभार मानले.
अधिक वाचा –
– वडगाव, लोणावळा शहरात शालेय साहित्य आणि फळे वाटप करून देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा
– मुळशी तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच, मुळशी धरणात तब्बल ‘इतका’ पाणीसाठा । Mulshi Taluka News