व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दिवाळीचे निमित्त साधून बापूसाहेब भेगडे घेताहेत मतदारांच्या गाठीभेटी, नागरिकांचाही उदंड प्रतिसाद । Bapu Bhegade

सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम असून नागरिकांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 2, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
On occasion of Diwali candidate Bapu Bhegade is meeting citizens of Maval Constituency

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असून नागरिकांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. अशातच मावळ विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे दिवाळीनिमित्त मतदारसंघातील नागरिकांच्या सदिच्छा भेटी घेत असून त्यांचे आशीर्वाद घेत आहेत.

यादरम्यान भेठीगाठीत, आपला विजय निश्चित आहे, आम्ही महाविजयासाठी कटिबद्ध आहोत, असा विश्वास भेटीनिमित्त नागरिक बापूसाहेब भेगडे यांना देत आहेत. बापूसाहेब भेगडे यांच्या भेटीगाठीची सुरुवात तळेगाव स्टेशन येथील विठ्ठल मंदिरापासून झाली. मंदिरात काकडा सुरू असल्याने भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठलाची मनोभावे पूजा करीत सर्वांना चांगले आरोग्य, धनसंपदा दे, असे साकडे त्यांनी विठ्ठलाला घातले.

बापूसाहेब भेगडे यांनी नागरिकांच्या घरी सदिच्छा भेट देत आस्थेने चौकशी केली. ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी खळदे आळी, डोळसनाथ कॉलनी, बाजारपेठ, सुभाष चौक, माळी आळी, शुक्रवार पेठ, भेगडे आळी आदी ठिकाणी जात नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले. सुवासिनींनी औक्षण केले. पेढे भरवून स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत बापूसाहेब भेगडे यांचे स्वागत केले.

तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ मंदिर, श्री गणेश मंदिर, संत शिरोमणी गोरा कुंभार मंदिर, कानिफनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेऊन त्यांनी स्थानिक मतदार आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी मावळ विधानसभेचा आश्वासक आणि चौफेर विकास साधण्यावर बापूसाहेब भेगडे यांनी भाष्य केले.

दिवाळीचा शुभ उत्सव सुरू झालेला आहे. सर्वांना शुभेच्छा दिल्या. आज भेटीगाठीवर भर दिला आहे. मावळच्या पुढच्या 50 वर्षांचा विचार करून सुनियोजित विकासाचा आमचा संकल्प आहे. भूमीपुत्र म्हणून मला परिसराची संपूर्ण माहिती आहे. नगरसेवक म्हणून मी योग्य विकासकामे करून दाखवली आहेत. मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा संकल्प आहे. – बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार, मावळ विधानसभा

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महायुतीचा मुख्यमंत्री होण्यासाठीच भाजपाचे कार्यकर्ते काम करतील ; सुनिल शेळके यांनी व्यक्त केला विश्वास
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– बापूसाहेब भेगडे हे मावळातील जनतेचे उमेदवार, त्यामुळे परिवर्तन अटळ – रामदास काकडे


Previous Post

लज्जा गौरी मोहीम : माळेगाव येथे सामुदायिक डोहाळे जेवण । Maval News

Next Post

वडगाव मावळ शहरात पोलिसांचा सशस्त्र रुट मार्च । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Police armed route march in Vadgaon Maval City

वडगाव मावळ शहरात पोलिसांचा सशस्त्र रुट मार्च । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Construction of new office of Maval Taluka Agricultural Produce Market Committee completed

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेव शेलार यांच्याकडून पदाचा राजीनामा

February 23, 2026
Kamshet Gram Panchayat has done development works worth Rs 25 crores in last five years said Sarpanch Rupesh Gaikwad

सरत्या पंचवार्षिक काळात २५ कोटींची विकासकामे कामशेत ग्रामपंचायतीने केली – सरपंच रुपेश गायकवाड

February 20, 2026
Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील बुलेटराजांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई ; 15 दुचाकींचे सायलेन्सर जप्त

February 20, 2026
Free travel service for 2369 SSC students from 71 villages in maval on initiative of MLA Sunil Shelke

आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने तालुक्यातील ७१ गावांतील दहावीच्या २,३६९ विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा

February 20, 2026
Demand to start CCTV cameras in closed areas of Vadgaon city Statement to administration

Vadgaon Maval : वडगाव शहरातील बंदावस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी ; प्रशासनाला निवेदन

February 18, 2026
Meritorious Teacher Award to 48 teachers from 24 centers in Maval taluka

Maval : मावळ तालुक्यातील २४ केंद्रातील ४८ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

February 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.