व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बाळूमामा उत्सवानिमित्त ‘खेळ रंगला पैठणीचा’, यशिका चौधरी ठरल्या मानाच्या पैठणीच्या मानकरी

दुर्गम भागात पहिल्यांदाच झालेल्या अशा कार्यक्रमाचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 7, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
khel-rangala-paithanicha

Photo Courtesy : Jitendra Botre


श्री बाळूमामा उत्सवानिमित्त मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील महिलांसाठी भाजपा महिला आघाडी मावळ तालुका आणि महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे यांच्याकडून ‘खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुर्गम भागात पहिल्यांदाच झालेल्या अशा कार्यक्रमाचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ( on occasion of Shree Balumama Utsav Khel Rangala Paithanicha organized by BJP Womens Aghadi Sayali Botre in Maval taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमात मानाच्या पैठणीच्या मानकरी यशिका चौधरी या ठरल्या. तर द्वितीय क्रमांक जानकी येवले यांनी आणि तृतीय क्रमांक किर्ती मोंगाळ, चतुर्थ क्रमांक सोनाली मरगळे, पंचम क्रमांक सुनिता होले, सहावा क्रमांक वैशाली हिरवे, सातवा क्रमांक सिता ठोंबरे यांनी पटकावला. तसेच यावेळी प्रत्येक सहभागी महिलेला अरविंद बालगुडे आणि सायली बोत्रे यांच्या वतीने साडी भेट देण्यात आली.

‘दुर्गम भागातील माझ्या मैत्रिणींच्या आनंदासाठी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला. माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर अविस्मरणीय कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. माझ्या प्रत्येक मैत्रिणीच्या चेहऱ्यावरील आनंद हेच या कार्यक्रमाचे यश होते,’ असे सायली बोत्रे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले.

सदर कार्यक्रमाला लोणावळा शहराच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, भाजपा प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, ग्रामपंचायत सदस्य अरविंद बालगुडे मीना शिंदे, सिमा ठोंबरे, राजु हिरवे, राजु जानकर, लक्ष्मण मरगळे, रमेश खरात, लहु तिडके, दहिवली पोलीस पाटील सागर येवले, वाकसई गण अध्यक्ष सचिन येवले, प्रसाद हुलावळे, सदाशिव बांगर, अनिल गायकवाड, आशिष बुटाला, सुजाता मेहता, रावळभाभी, सांगीसे उपसरपंच चंदा पिंगळे, भाजप महिला कार्याध्यक्ष सुमित्रा जाधव, संघटन सरचिटणीस कल्याणी ठाकर, नाणे मावळ महिला अध्यक्ष सीमा आहेर, भाजपा महिला उपाध्यक्ष रोहिणी गाडे, अश्विनी तिकोणे, अंजली कडू, सुप्रिया शेलार, सुजाता शेलार, मनीषा चौधरी यांसह महिलाभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अधिक वाचा –
– टाटा डॅममध्ये बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा शोध घेण्यात पहिल्या दिवशी अपयश, शुक्रवारी पुन्हा होणार ‘सर्च ऑपरेशन’ 
– ‘ज्या वाडी-वस्तीवर अद्याप वीज नाही तिथे वीज पोहचवा’, महावितरणच्या अधिकाऱ्यांना आमदार शेळकेंच्या सुचना, वाचा


dainik maval jahirat

Previous Post

टाटा डॅममध्ये बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा शोध घेण्यात पहिल्या दिवशी अपयश, शुक्रवारी पुन्हा होणार ‘सर्च ऑपरेशन’

Next Post

शिवसेना ठाकरे गटाची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर; तालुका संघटक पदी 5 जणांची निवड

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shiv-Sena-Uddhav-Balasaheb-Thackeray-Party

शिवसेना ठाकरे गटाची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर; तालुका संघटक पदी 5 जणांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.