हरितक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती मावळच्या सभागृहामध्ये कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रताप पाटील, वडगाव कृषी संशोधन केंद्राचे डॉ. नरेंद्र काशीद, तुकाराम भोर, एन आय पी एच टी तळेगावचे बांबू पिक मार्गदर्शक भागवत सपकळ, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, तालुक्यातील सर्व मंडळ कृषि अधिकारी,कृषि पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक ,पंचायत समिती कृषी ,पशुसंवर्धन विभाग,सरपंच,ग्रामसेवक व पुरस्कार प्राप्त शेतकरी उपस्थित होते. ( on occasion of vasantrao naik birth anniversary progressive farmers were honored in maval panchayat samiti )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर कार्यक्रमांमध्ये भात पीक स्पर्धेमध्ये राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरावर बक्षीस विजेते शेतकऱ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कृषी दिनाच्या कार्यक्रमात अन्नप्रक्रिया उद्योगाबाबत पी टी काळे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर भागवत सपकळ यांनी बांबू विषयावर मार्गदर्शन करताना बांबूच्या विविध जाती त्यांच्यापासून तयार होणारी विविध उत्पादने बांबूची शेती कशी फायदेशीर आहे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ( on occasion of vasantrao naik birth anniversary progressive farmers were honored in maval panchayat samiti )
कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ नरेंद्र काशीद यांनी उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी भात पिकाची कशी काळजी घ्यायची, भाताचे रोप गादीवाफ्यावर कशाप्रकारे तयार करायचे, भात लागवड कशी करायची त्याला कोणते खत व औषध वापरायचे, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रगतशील शेतकरी नितीन गायकवाड यांनी भाताचे विक्रमी उत्पादन कशाप्रकारे घेतले याचे स्वतःचे अनुभव कथन केले. वडगावचे पगडे या शेतकऱ्यांनी भात पिकाबरोबरच आळू आणि शेवगा या पिकातून कमी क्षेत्रात अधिकचे उत्पादन कशाप्रकारे घेता येईल याबाबत सांगितले. गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन अधिकचे उत्पादन कसे घेता येईल व त्यांच्या शेतीमालाचे विक्री कशाप्रकारे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण,पी एम किसान, फळबाग लागवड इत्यादी योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीएम किसान व नमो किसान या योजनेचा लाभ घेण्यास पुढे आले पाहिजे, असे आवाहन केले. त्याचबरोबर सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांना आवश्यक ती कागदपत्रे पुरवण्याचे आवाहन केले. पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अभिनंदन करताना त्यांचा आदर्श तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन केले. शासनाच्या सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, यांत्रिकीकरण योजना, बांबू लागवड यांचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
सहाय्यक गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन संताजी जाधव कृषी अधिकारी यांनी केले. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन विस्तार अधिकारी निकेतन धापटे, वासंती बोराटे, आत्माचे बी टी एम राहुल घोगरे, पंचायत समितीचे दीपक राक्षे, शकुंतला मोरमारे यांनी केले.
अधिक वाचा –
– ‘मोदी सरकारचे 9 वर्षातील यश’ निबंध स्पर्धा : हचिंग्ज स्कूलमधील स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे
– विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी आमदार सरसावले; विद्यार्थ्यांना ‘ऑफ लाईन’ पद्धतीने दाखले द्या – आमदार सुनिल शेळके