Dainik Maval News : मुंबई उपनगर रेल्वेतील मुंब्रा-दिवा स्थानकावर झालेल्या दुर्घटनेनंतर असुरक्षितरित्या रेल्वे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यापार्श्वभूमीवर पुणे-लोणावळा लोकलसेवेत ‘फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.
ह्या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘आरपीएफ’द्वारा विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नियमभंग करणाऱ्या रेल्वे प्रवाशांवर जागेवरच कारवाई केली जाणार आहे. रेल्वे सुरक्षा बलच्या (आरपीएफ) आयुक्त प्रियांका शर्मा यांनी यासंबंधीचा आदेश दिला आहे. रेल्वे कायद्याच्या १५६व्या कलमानुसार ही कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.
मुंबईतील रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे प्रशासन ही विशेष मोहीम राबवित आहे. यासाठी ‘आरपीएफ’च्या जवानांना लोकलमध्ये गस्त घालण्याची सूचनाही देण्यात आली आहे. यासह पुणे-लोणावळा दरम्यान असलेल्या विविध स्थानकांपाशी प्रवाशांवर विशेष नजर ठेवली जाईल.
धावत्या गाड्यांच्या दारात प्रवासी उभा असल्यास प्रत्यक्ष दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी पुणे-लोणावळा दरम्यान प्रवास करताना रेल्वेच्या नियमांचे पालन करण्याचे आणि सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ ; मावळ तालुक्यातील 24 शाळांचा समावेश
– केंद्र सरकारने पोल्ट्री व्यवसायासाठी बनविलेली नियमावली महाराष्ट्रात तातडीने लागू करा ; मावळ पोल्ट्री संघटनेचे निवेदन
– देहूरोड खून प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक ; पोलिसांनी गुजरातच्या वडोदरातून घेतले ताब्यात । Maval Crime
– विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले तज्ज्ञांचे मार्गदर्शन । Maval News