Dainik Maval News : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (दि.29) रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास चांदखेड-कासारसाई रोड, मावळ येथे करण्यात आली.
ओमकार अनिल राऊत (वय 38, रा. नेरे दत्तवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार सचिन काचोळे यांनी याप्रकरणी रविवारी (दि.30) शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदखेड ते कासारसाई रोडवर शिरगाव पोलिसांनी ओमकार राऊत याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 25 हजार 100 रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
– दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई
– राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे
– तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade