Dainik Maval News : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचने एका व्यक्तीला अटक केली. ही कारवाई दहा मार्च रोजी रात्री अकरा वाजता गहुंजे गाव येथे करण्यात आली.
स्वप्नील किसन मुऱ्हे (वय ३४, रा. सोमाटणे गाव, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार श्यामसुंदर गुट्टे यांनी मंगळवारी (दि. ११) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे गाव येथे स्टेडियमकडे जाणाऱ्या रोडवर एक व्यक्ती पिस्तूल घेऊन आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून स्वप्नील याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News