Dainik Maval News : मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्रित लढवण्याचे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंमध्ये जवळपास निश्चित झाले आहे. परंतु महापालिका निवडणुकीत काँग्रेस (आय), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या महाविकासआघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) नको असा सूर काँग्रेस कार्यकर्त्यांनी लागावला आहे. दुसरीकडे मुंबईत मनसेला विरोध करीत असलेली काँग्रेस मावळात मात्र मनसे सोबत महाविकासआघाडी म्हणून निवडणूक लढविण्यास तयार आहे.
सोमवारी ( दि. २७ ) मावळ तालुक्यात महाविकासआघाडीतील प्रमुख घटकपक्षांच्या तालुकाध्यक्षांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ हे देखील उपस्थित होते. या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी मावळ तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकासआघाडी म्हणून एकत्र लढविण्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा – ठरलं तर… मावळ तालुक्यात ‘हे’ 5 पक्ष ‘महाविकासआघाडी’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार
निवडणुकाच्या निमित्ताने मावळ तालुक्यात नेहमीच राज्याच्या राजकारणापेक्षा वेगळे प्रयोग पाहायला मिळतात. कधी काँग्रेस सोबत भाजपा असते तर कधी राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असतो. आता देखील राज्याच्या राजकारणात मनसेला महाविकासआघाडीत घ्यायला ना-ना करणारे काँग्रेस मात्र मावळ तालुक्यात मनसे सोबत पुढे जाण्यासाठी तयार असून एक पाऊल पुढे येथे शेजारी-शेजारी बसून तालुक्याच्या निवडणुकांचे रणशिंग देखील फुकल्याचे दिसून आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– हजारोंची गर्दी… दमदार एन्ट्री… बापूसाहेब भेगडे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज ! चार पक्षांचे तालुकाध्यक्ष उपस्थित
– मोठी घडामोड ! भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून रविंद्र भेगडे यांनीही भरला उमेदवारी अर्ज । Maval Vidhan Sabha
– उमेदवाराची ओळख : सुनिल शेळके यांचे शिक्षण किती? कौटुंबिक माहिती आणि राजकीय कारकीर्द, वाचा सविस्तर



