Dainik Maval News : फुल उत्पादक शेतकरी कंपनी यांच्यासाठी संस्था परिसरात किंवा थेट शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावेत, यामुळे फुल निर्यातीस चालना मिळेल, असे निर्देश पणन मंत्री तथा राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी आढावा बैठकीत दिले.
यावेळी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सर व्यवस्थापक विनायक कोकरे, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे संचालक मिलिंद आकरे, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आदी उपस्थित होते.
मंत्री जयकुमार रावल म्हणाले, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे येथे त्रिभुवन सहकार विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच सुरू करण्यात येईल, यामुळे संस्थेच्या उत्पन्नवाढीस मोठी चालना मिळेल. नेदरलँड, इजराईल, जपान व तांजानिया येथील विद्यापीठांचे सहकार्य घेत फुल उत्पादक शेतकऱ्यांकरिता आंतरराष्ट्रीय पातळीववरील प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत.
आफ्रिका खंडाअंतर्गत येणाऱ्या देशामधील कृषी विभागाशी संपर्क साधून तेथील शेतकऱ्यांना या संस्थेमध्ये किंवा त्या देशामध्ये जाऊन प्रशिक्षण द्यावे. इतर राज्यांच्या कृषी, फलोत्पादन विभागांशी संपर्क साधून त्या राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना संस्थेत प्रशिक्षण द्यावे.
राज्यातील साखर कारखान्यांना संस्थेचे सभासद करुन त्यांच्या कार्यक्षेत्रामधील शेतक-यांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम घेणे. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण राबवावे. संस्थेच्यावतीने कृषी पर्यटन व नॅचरोपॅथीसारखे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करावेत. बांबू मूल्यवर्धन केंद्राच्या बांबू सायकलचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्याबाबत मंत्री जयकुमार रावल यांनी मार्गदर्शन केले.
संस्थेचे उपक्रम आणि सुविधांची घेतली माहिती
मंत्री जयकुमार रावल यांनी संगणकीकृत वर्गखोल्या (डिजिटल क्लासरूम), उपहारगृह इमारत, शीतगृह विस्तारित इमारतीची पाहणी केली. निवासी सुविधा, एम.बी.ए. महाविद्यालय, पी.टी.सी. प्रयोगशाळा, माती व पाणी तपासणी प्रयोगशाळा यांची माहिती देण्यात आली. श्री. आकरे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली तसेच मार्च २०२६ पर्यंतचा प्रशिक्षण आराखडा सादर केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News
– मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार – जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne
– मावळ तालुक्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : e-KYC साठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया