पवना शिक्षण संकुलातील पवना विद्या मंदिर व लायन शांता मानेक पवना जुनिअर कॅालेज, कै सौ मिराबाई दशरथ भोंगाडे प्राथमिक विद्यालयाच्या वतिने घेण्यात आलेल्या दिडीं सोहळ्याने पवनानगरीला भक्तीमय आळंदीचे स्वरूप आले होते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शाळेने कार्तिकी महाएकादशी व आळंदी यात्रेनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वारकऱयांची वेषभुषा करून या दिंडीमध्ये शाळेतील एक हजार विध्यार्थी सहभागी झाले होते. तर संत ज्ञानेश्वर, नामदेव,तुकाराम,मुक्ताबाई या संताच्या वेषभूषा परिधान करून हरिनामाच्या जयघोषात त्यांची पालखीबरोबर मिरवणुक काढण्यात आली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सकाळी नऊ वाजता नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, श्री. छत्रपती शिवाजी विद्या मंदिर कान्हे शाळेचे मुख्याध्यापक पांडूरंग ठाकर,वंदना ठाकर व काले विठ्ठल रुक्मिणी मंदिरचे विश्वस्त प्रल्हाद कालेकर व विमल कालेकर यांच्या हस्ते माऊलींच्या प्रतीमचे व पालखीचे व विना पुजन करण्यात आले तर कडधे गावचे माजी सरपंच भोसले व संजीवनी भोसले व प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन करण्यात आले. यावेळी संतोष खांडगे बोलताना म्हणाले कि,दिंडी सोहळा आयोजित केल्याने विद्यार्थ्यांवर बालवयातच संस्कार होतात त्यामुळे संपूर्ण सांप्रदायिक क्षेत्राचे कार्य व संताचे विचार विद्यार्थ्यांना ज्ञात होतात त्यामुळे शालेय पातळीवर असे दिंडी सोहळ्यांची गरज आहे.
यावेळी मावळ तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष व शालेय समितीचे सदस्य सुनिल भोंगाडे,काले गावच्या उपसरपंच छायाताई कालेकर, माजी उपसरपंच अमित कुंभार, रंजना कालेकर शाळेच्या पर्यवेक्षिका अर्चना शेडगे, शालेय समिती सदस्य नारायण कालेकर,अमरजा इस्टेटचे व्यवस्थापक संदिप भाये,मंगेश कालेकर,लोणावळा ग्रामीणचे पोलिस जमादार विजय गाले व पोलिस हवालदार विजय पवार , भिमराव वाळुंज, सचिन ठाकर, किशोर शिर्के, दत्तात्रय कालेकर, धनंजय कालेकर नवनाथ आढाव अनेक माजी विद्यार्थी व मान्यवर उपस्तित होते. ( Organized Dindi ceremony at Pavana Education Complex Pavananagar Maval )
दिंडी शाळेतुन निघाल्यानंतर पवनानगर पाटबंधारे वसाहत येथुन पवनानगर चौक,काले गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा पर्यंत पालखी नेण्यात आली. दिंडीमध्ये भजन पथका बरोबरच लेझिम पथक,वृक्ष दिंडी,ग्रंथ दिंडी,पर्यावरण दिंडी यांनी सहभाग घेतला होता यावेळी शाळेतील १५० विद्यार्थीनींनी टाळांच्या ठेक्यात ब्रम्ह नाद केला होता या आवाजामुळे पवनानगर परिसर दुमदुमून गेला होता या पथकांनी पवनानगर चौकात प्रात्यक्षिके दाखवुन नागरिकांची वाहावाह मिळविली. दिंडीचे हे २५ वे वर्ष असुन अनेक ठिकाणी दिंडीचे जोरदार स्वागत केले. अनेक ठिकाणी ग्रामस्थ व शिक्षक यांनी सांप्रदायिक खेळ, फुगडी खेळत दिंडीत सहभागी झाले होते. त्यामुळे पवनानगरला आळंदीचे स्वरूप प्राप्त झाले होते हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.महिलांनी जागोजागी पालखीची ओवाळणी करून पुजन केले.
यावेळी पवनानगर व्यापारी मित्र मंडळ,मार्च १९९९- २००० बॅच यांनी पवनानगर चौकात भव्य महाआरती आयोजित केली होती तसेच या बॅचने सुरु असलेल्या माजी विद्यार्थी सभागृह साठी ५१ हजार रुपयांची देणगी दिली तसेच दुर्गामाता मित्र मंडळ पाठबंधारे वसाहत,शिवतेज मित्र मंडळ, ॐ श्री भैरवनाथ मंडळ,व सामाजिक संस्थांनी विद्यार्थ्यांना जागोजागी खाऊ व फराळाचे वाटप केले. सर्व काले ग्रामस्थांनी काले गावाच्या वेशीवर भजन मंडळ घेऊन येत पालखीचे उत्साहात स्वागत केले. काले येथील विट्ठल रूक्मिणी मंदिरात आरती घेऊन फराळाचे वाटप करत पालखीचा समारोप करण्यात आला.
दिंडी सोहळ्याचे आयोजन पवना शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संतोष खांडगे, प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांंच्या मार्गदर्शनाखाली दिंडी प्रमुख गणेश ठोंबरे,राजकुमार वरघडे तसेच सर्व पवना शिक्षण संकुलातील सर्व शैक्षणिक विभागाचे प्रमुख व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचा-यांनी केले होते. प्रास्ताविक प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी केले कार्यक्रामाचे सुत्रसंचलन रोशनी मराडे, भारत काळे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांनी मानले.
अधिक वाचा –
– तळेगाव रोटरी क्लबच्या वतीने 488 विद्यार्थ्यांचे धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण । Talegaon Dabhade
– मावळचे खासदार श्रीरंग बारणेंना लोकसभेच्या पीठासीन अधिकारी पदाचा बहुमान; लोकसभा अध्यक्षा ओम बिर्ला यांची घोषणा
– गतिरोधकावरुन दुचाकी स्लीप झाल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू