मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वडगाव मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून मुळ दस्तच गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. रतन मोतीराम मराठे (वय 49, रा. भुशी, लोणावळा) या व्यापाऱ्याने या प्रकरणी फिर्याद दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानुसार, सदर व्यापाऱ्याच्या मिळकती हडप करण्याच्या उद्देशाने त्यांच्या मिळकतींच्या मूळ दस्तांचा थांगपत्ता लागू नये, यासाठी वडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील अनोळखी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून दस्त अभिलेखातून काढून घेवून नष्ट केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रतन मराठे यांच्या मिळकती हडप करण्याच्या उद्देशाने आरोपींनी 16 डिसेंबर 2022 पूर्वी वडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या मिळकतींच्या मूळ दस्तांचा थांगपत्ता लागू नये, यासाठी अकरा मूळ खरेदी दस्त अभिलेखातून काढून नष्ट केले. पोलिस हवालदार ननावरे पुढील तपास करत आहेत. ( Original document missing from Vadgaon Maval Secondary Registrar office case registered )
हेही वाचा –
– व्हॉट्सअॅपचा मेसेज ते चौकात बॅनर लावणे, कलम 144 मुळे लोहगड-घेरेवारी भागात कशावर प्रतिबंध? जाणून घ्या
– इंद्रायणी नदीचे प्रदूषण थांबवा, पुलाला संरक्षक कठडे बसवा; कातवी ग्रामस्थांचे थेट मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन