पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख आणि राष्ट्रपती राहिलेले परवेज मुशर्रफ यांचे निधन झाले आहे. 2016 पासून परवेज मुशर्रफ दुबई येथे स्थायिक झाले होते. मागील अनेक दिवसांपासून दुबईमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले असल्याची माहिती आज (5 फेब्रुवारी) रोजी समोर आली आहे. हुकूमशाही पद्धतीने चालवलेली सत्ता आणि अत्यंत वादातीत राहिलेले संपूर्ण आयुष्य यामुळे परवेज मुशर्रफ यांचे नाव नेहमीच काढले जाते, जाईल. ( Pakistan Former President Pervez Musharraf Passes Away At Age 79 In Dubai )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जीवनी आणि राजकीय कारकीर्द…
परवेज मुशर्रफ यांचे रविवारी दुबईत निधन झाले, मृत्यूसमयी त्यांचे वय 79 होते. मुशर्रफ यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 साली दिल्लीच्या दरियागंज इथे झालेला. 1947 च्या फाळणीदरम्यान मुशर्रफ यांचे कुटुंब पाकिस्तानात गेले आणि कराचीत स्थायिक झाले. 1961 साली मुशर्रफ पाकिस्तानी सैन्यात रुजू झाले. 1999 साली मुशर्रफ यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सरकार उलथवून सत्ता ताब्यात घेतली. तत्पूर्वी त्यांच्याच कृतीकर्तृत्वामुळे भारतावर कारगिल युद्ध लादले गेले होते, ज्यात पाकचाच पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी सत्ता उलथवून ती आपल्या हाती घेतली होती. तसेच 20 जून 2001 ते 18 ऑगस्ट 2008 पर्यंत ते पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते. ( Former Pakistan President Pervez Musharraf dies )
मरताना राष्ट्रद्रोही…
मुशर्रफ यांनी तब्बल एक दशक पाकिस्तानवर हुकूमत गाजवली. मात्र 2009 साली त्यांच्यावर आणीबाणी लावल्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. 2016 साली न्यायालयाची परवानगी घेऊन उपचारासाठी मुशर्रफ दुबई येथे रवाना झाले, तेव्हापासून ते दुबईत होते. मात्र विशेष न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले आणि 2019 साली सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रद्रोहाचा आरोपाखाली मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावली. अखेर मरताना हा हुकूमशहा एक देशद्रोही म्हणूनच मेला.
अधिक वाचा –
– पोलिसांना मारहाण करुन फरार झालेल्या आरोपींना जेरबंद करण्यात यश; कामशेत पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी
– सरकारी नोकरीत मराठा उमेदवारांना ‘EWS’ आरक्षणाची संधी नाही, ‘मॅट’चा मोठा निकाल