आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या भेटीसाठी राज्यात पालखी सोहळा सुरू झाला असून 13 जूनला श्री संत गजानन महाराज मंदिर ‘श्रीं’च्या पालखीने शेगाव, बुलढाणा जिल्ह्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण पालखी मार्गावर आतापर्यंत (14 जून) एकूण 1 हजार 763 वारकऱ्यांना आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य सेवा देण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, देहू-आळंदी ते पंढरपुर तसेच महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या हजारो पालख्या, दिंड्या मार्गावर आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य विषयक सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहे. ( Pandharpur Ashadhi Wari Warkari will get health care facilities on Palkhi route )
महाराष्ट्रातील विविध पालख्यांच्या मार्गावर देण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सेवा-सुविधा :
1. आरोग्य विभागाकडून एकूण 6 हजार 368 अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत महाराष्ट्रातील विविध पालखी मार्गावर आवश्यकतेनुसार वारकऱ्यांची मोफत तपासणी व औषधोपचार करुन आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.
2. 258 तात्पुरत्या ‘आपला दवाखान्या’च्या माध्यमातून (प्रत्येकी पाच किलोमीटर अंतरावर 1 याप्रमाणे) मोफत सेवा पुरविण्यात येत आहे.
3. 707 (102 व 108) रुग्णवाहिकांमार्फत पालखी मार्गावर 24×7 पद्धतीने आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे.
4. पुणे परिमंडळ पुणे व पुणे जिल्हा परिषद स्तरावरुन 4 आरोग्य पथके सुसज्ज रुग्णवाहिकेसह अविरत पालखी परतेपर्यंत सोबत राहणार आहेत.
5. 212 आरोग्यदुतांमार्फत (बाईक ॲम्बुलन्स) पालखी मार्गावर आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.
6. 5 हजार 885 औषधी किटचे विविध दिंडी प्रमुखांना मोफत वाटप करण्यात येणार आहे.
7. 136 हिरकणी कक्षांची स्थापना पालखी मार्गावरील आरोग्य संस्थेच्या ठिकाणी तसेच पालखी तळावर करण्यात आलेली आहे.
8. महिला वारकऱ्यांसाठी 136 स्त्रीरोग तज्ज्ञ पालखी मार्गावरील रुग्णालयामध्ये कार्यरत असतील.
9. पालखी मुक्कामच्या प्रत्येक ठिकाणी 5 बेडची क्षमता असलेले 87 अतिदक्षता विभाग उभारण्यात आलेले आहेत.
10. पालखी मार्गावरील सर्व हॉटेल्स व त्याअंतर्गत असलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी तसेच पाणी नमुने तपासणी करण्यात येत असून, पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणच्या किचनची देखील तपासणी करण्यात येणार आहे.
11. पालखी मार्गावर 156 टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येणार असून पालखी मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी धूर फवारणी, पाण्याच्या सर्व स्रोतांचे ओटी टेस्ट तसेच आरोग्य संस्थांमार्फत जैव कचरा विल्हेवाट करण्यात येत आहे.
12. पालखी मार्गावर आरोग्य विषयक जनजागृती करण्यात येणार आहे.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या फुलाबाई काळे यांचे निधन । Talegaon Dabhade
– मावळ प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून नवलाख उंब्रे येथील श्रीराम मंदिराजवळ वृक्षारोपण । Maval News
– तळेगाव दाभाडेमधील हॉटेल थंडा मामला येथे चोरी । Talegaon Crime