लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभागासाठी, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना 17 व्या लोकसभेतही संसद महारत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पाच वर्षांतून हा पुरस्कार एकदाच दिला जातो. यापूर्वी सोळाव्या लोकसभेतील कामगिरीसाठीसुद्धा खासदार बारणे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. 17 फेब्रुवारी 2024 रोजी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. चालू 17 व्या लोकसभेत खासदार बारणे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम आहे. त्यांनी 605 प्रश्न विचारले आहेत. 159 चर्चामध्ये सहभाग घेतला तर, 13 खासगी विधेयके मांडली आहेत. खासदार बारणे यांची सभागृहात 94 टक्के उपस्थिती आहे. ( Parliament Maharatna Award announced to Maval MP Shrirang Appa Barne )
या कामगिरीसाठी त्यांना पुन्हा एकदा संसद महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, याच संस्थेचा संसदरत्न पुरस्कार त्यांना सलग सात वेळा, संसद विशिष्टरत्न पुरस्कार एकवेळा प्रदान करण्यात आला आहे. संसदेतील सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी आणि त्याच वेळी आपल्या मतदार संघातील नागरिकांसाठी जनहिताची केलेली कामे यांचा या पुरस्कार निवडीसाठी विचार करण्यात आला आहे. नगरसेवक ते खासदार असा श्रीरंग बारणे यांचा राजकीय प्रवास आहे.
मतदारांच्या विश्वासाला सार्थ ठरलो – बारणे
दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेने दोनवेळा माझ्यावर विश्वास टाकला. मोठ्या मताधिक्याने लोकसभेत निवडून पाठविले, त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे. गेल्या साडेनऊ वर्षांपासून करत असलेल्या कामाला मिळालेली पावती आहे. हा पुरस्कार माझा नसून मतदारसंघातील जनतेचा आहे. मतदारांच्या विश्वासाला सार्थ ठरलो असल्याची भावना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली.
अधिक वाचा –
– अवैधरित्या गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर शिरगाव पोलिसांचा छापा, लाखो रुपयांचे रसायन जप्त
– द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक! वीकएंड आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहन चालकांना जाहीर आवाहन, वाचा सविस्तर
– मोठी बातमी! मावळ तालुक्यातील पाणी योजनांच्या कामांची चौकशी होणार; मंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश