संत ज्ञानेश्वर विरचित ज्ञानेश्वरी या ग्रंथातील शेवटच्या (ओवी १७९४ ते १८०२) १८ व्या अध्यायाचे समापन ज्या प्रार्थनेने होते ते म्हणजे पसायदान. श्री क्षेत्र आळंदी येथील गो दान पसायदान विश्वजागृती धर्मादाय संस्था, श्री मारुती देवस्थान गोपाळपुरा यांच्या सर्व समाजाला प्रेरणादायी आणि संस्कृती जतनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले पसायदान विश्व दीप कृती समितीच्या अध्यक्षपदी वडगांव मावळ येथील भास्करराव म्हाळसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ( Pasaydan Vishwa Deep Action Committee Bhaskarrao Mhalskar Apointed as President Vadgaon Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पसायदान गोदान विश्र्वजागृती धर्मादाय संस्थेचे अध्यक्ष मुबारक भाई शेख, सचिव भाऊसाहेब घोडके, खजिनदार रामदास रानवडे, सह खजिनदार विनायक मोकाशी, मार्गदर्शक श्रीमंत मोरे, रामदास जैद, विठ्ठलराव घारे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरुडे, सदस्य महेश राऊत , प्रशांत दरेकर शिवाजी पाटील, ॲड. निवृत्ती फलके, पत्रकार सुदेश गिरमे, दत्तात्रय साबळे, नवनाथ शिंदे, सुनील ढोबळे, भाऊसाहेब लिंबोरे, राजू पटेल, अनिल पाटील, उमाजी बिसेन आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.
पसायदान गोदान विश्र्वजागृती धर्मादाय संस्थेचे अध्यक्ष मुबारक शेख यांनी प्रास्ताविक केले आणि या उपक्रमाची संकल्पना विशद केली. रामदास जैद यांनी आपल्या मनोगतात या विश्वव्यापक तसेच समाजाला प्रेरणादायी ठरणाऱ्या प्रकल्पाचे महत्त्व सांगितले. नवनिर्वाचित अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात जेथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि पहिल्यांदा वाचून दाखविली त्या महाराष्ट्रातील नेवासे या ठिकाणी सर्वांच्या सोबतीने देशातील पहिला पसायदान स्तंभ उभारण्याचा मानस व्यक्त केला.
पसायदान स्तंभ महाराष्ट्रात मराठी भाषेसह भारतातील विविध राज्यांमध्ये देखील स्थानिक प्रादेशिक भाषांमध्ये देखील उभारण्यात येणार आहे. पसायदानानंतर सभेची सांगता झाली.
अधिक वाचा –
– Breaking! मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर घाटात दरड कोसळली, तब्बल साडेतीन तास मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद
– व्वाह पोराहो…शाब्बास!! शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत भोयरे शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा समावेश