Dainik Maval News : मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास करीत असलेल्या एका प्रवाशाचे खोपोली जवळील फूड मॉल येथे प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुनील राम शिंदे (वय 45, रा. चांदगाव, अहमदनगर) असे प्रवासात मृत पावलेल्या व्यक्तीने नाव आहे.
सुनील शिंदे हे महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळच्या दादर-स्वारगेट बस (क्रमांक एमएच १४ एलएक्स ७२१५) मधून ते प्रवास करीत होते. एक्सप्रेस वेवरील फूड मॉल येथे बस थांबली असता तिथेच शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आला, सहप्रवासी यांनी त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास खोपोली पोलीस करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News