Dainik Maval News : ‘पवना धरणग्रस्तांना प्रत्येकी 2 एकर जमीन’ हे वृत्त निराधार असल्याचे अॅड. खंडूजी तिकोणे यांनी म्हटले आहे. त्याबाबत त्यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया सोशलवर दिली आहे. ‘पवना धरणग्रस्तांना प्रत्येकी चार एकर जमीन मिळावी या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. यापुर्वीही 2 एकरचा प्रस्ताव शेतकऱ्यांना मान्य नव्हता म्हणून धरणग्रस्त शेतकऱ्यांनी सन 2013 मध्ये मुंबई हायकोर्टात पिटीशन क्रमांक 4688/2013 अन्वये याचिका दाखल केलेली होती. सदर याचिकेवर मुंबई हायकोर्टाने जमीन वाटपा बाबत स्टे दिलला होता आणि तो अद्याप पर्यंत आहे.’ असे तिकोणे यांनी म्हटले आहे.
“मुंबई हायकोर्टाने स्टे दिलेला असताना महाराष्ट्र शासन जमीन वाटपाबाबत निर्णय घेऊ शकत नाही. जर असा निर्णय घेण्यात आल्यास तो मा. मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान होऊन महाराष्ट्र शासनावर कंटेम आॅफ कोर्टची कारवाई होवू शकते, हे शासनालाही माहीत आहे. शासनाला प्रस्ताव पाठविणे. प्रस्तावाला मंजुरी देणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. प्रस्ताव म्हणजे ठराव नव्हे शासनाकडे अनेक प्रस्ताव येत असतात. प्रस्तावाला मंजुरी मिळतेच, असे नाही.”
पवना धरणग्रस्तांनी गेले 50/60 वर्षे खूप सोसले आहे. कृपया कोणीही जमीन वाटपाबाबत फसवे वृत्त देऊ नये. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना 2 एकर व नंतरच्या टप्प्यात 2 एकर जमीन शेतकऱ्यांना देऊ, असे सरकारच्या वतीने मा.मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र व पुरशीस दाखल करून हुकुम नामा मिळवावा, म्हणजे खऱ्या अर्थाने जमीनचे वाटप शेतकऱ्यांना झाले असे म्हणता येईल. तोपर्यंत हे फक्त निवडणूकी पुरते दाखवलेले गाजर आहे असेच म्हणावे लागेल., अशी प्रतिक्रिया अॅड. खंडूजी तिकोणे यांनी दिली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कुंभार समाजोन्नती मंडळाच्या मावळ तालुका युवक अध्यक्षपदी जयंत कुंभार । Maval News
– महत्वाची बातमी ! ‘मुख्यमंत्री योजनादूत’ बनण्यासाठी अर्ज करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, असा करा अर्ज । Mukhyamantri Yojana Doot
– ‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, ‘इथे’ करा अर्ज । Pune News