मावळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात अद्याप म्हणावा तसा मान्सून बरसताना दिसत नाहीये. काही काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. परंतू पाणीसाठ्यात भर घालणारा पाऊस अद्याप झालेला नाही. मावळ तालुक्यातही ग्रामीण भागात शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मागील दोन दिवसात मान्सूनच्या सरी कोसळल्या. परंतू, त्यामुळे ओढे- ओहळे काही प्रवाहित झाले नाही. तरीही गुरूवार आणि शुक्रवारी झालेल्या थोड्याथोडक्या पावसाने पवना धरणातील जलसाठा स्थिर होण्यास मदत मात्र झाली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पवना धरण परिसरात शनिवार सकाळी 6 वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार शुक्रवारी (दि. 21 जून) 55 मी.मी. पावसाची नोंद झाली. यासह यंदाचा एकूण पाऊस 179 मी.मी असल्याची नोंद आहे. पवना धरणातील सध्याचा पाणीसाठी हा 18.85 टक्के इतका आहे. गतवर्षी यावेळी धरणात 18.62 टक्के इतका पाणीसाठा होता. ( Pavana Dam Water Storage Rainfall Updates at present 18 percent water storage in dam )
मावळ तालुक्यातील हजारो शेतकरी बांधव यांसह पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो नागरिकांची तहान भागविणारे पवना धरण जलसाठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. पवना धरणाची साठवण क्षमता सुमारे 10 टीएमसी आहे. धरणाचे बांधकाम 1963 मध्ये सुरू झाले होते आणि 1972 मध्ये संपले. पवना धरण 1,329 मीटर (4,360 फूट) लांब आणि 42.37 मीटर (139.0 फूट) उंच आहे. त्याची एकूण साठवण क्षमता 0.24 किमी (0.058 cu mi) आहे.
अधिक वाचा –
– पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात ! संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथाला चांदीचा मुलामा । Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala
– देहूगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मयूर शिवशरण यांची निवड । Dehu Nagar Panchayat
– लोणावळा महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा ; योग अभ्यासकांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना दिले योगाचे धडे