Dainik Maval News : पवन मावळातील पवना कृषक सेवा सहकारी संस्थेची निवडणूक 23 फेब्रुवारी रोजी होणार असून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी (दि.22) शेवटचा दिवस होता. यावेळी 13 जागांसाठी एकूण 64 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. के. निखारे यांनी दिली. ( Pavana Krishak Seva Sahakari Sanstha)
पवना कृषक सेवा सहकारी संस्था :
महाराष्ट्र बँकेने 1974 मध्ये स्थापन केलेल्या पवन मावळातील सर्वात मोठ्या पवना कृषक संस्थेचे सुमारे 35 गावांचे कार्यक्षेत्र आहे. संस्थेचे पूर्वी साडेतीन हजार सभासद होते. त्यातील काही सभासद मयत झाले असून अनेक जण थकबाकीदार असल्याने व काहींच्या नावावर जमीन नसल्याने ते निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेण्यास अपात्र ठरले आहेत. सद्यस्थितीत पात्र सभासदांची संख्या 932 इतकी आहे. संस्थेची मुदत संपून सहा वर्षे झाली होती. निवडणूक लांबल्यामुळे या कालावधीत संस्थेवर प्रशासकीय समित्या कार्यरत होत्या. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सहकार खात्यातील निवडणुका पुन्हा सुरू झाल्यानंतर पवना कृषक संस्थेची निवडणूक जाहीर झाली.
निवडणूक कार्यक्रम :
दिनांक 16 ते 22 जानेवारी उमेदवारी अर्ज दाखल करणे, 23 जानेवारी उमेदवारी अर्जांची छाननी, 24 जानेवारी वैध अर्जांची प्रसिद्धी, 7 फेब्रुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख, 10 फेब्रुवारी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी व चिन्ह वाटप, 23 फेब्रुवारी मतदान संपल्यानंतर मतमोजणी करण्यात येणार असून निवडणुकीचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. के. निखारे यांनी दिली.
तेरा सदस्यांसाठी निवडणूक :
संस्थेच्या एकूण तेरा जागा असून त्यामध्ये आठ सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी, दोन महिला प्रतिनिधी, एक अनुसूचित जाती व जमाती प्रतिनिधी, एक मागास वर्ग प्रतिनिधी, एक भटक्या जाती जमाती/ विशेष मागास प्रवर्ग या जागांचा समावेश आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link