‘आजचे विद्यार्थी हे आधुनिकतेच्या जगतात वावरणारे आहेत. त्यामुळे त्यांनी संशोधनात्मक वृत्ती बाळगावी,’ असे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी पवनानगर येथे व्यक्त केले. पवना विद्या मंदिर, लायन शांता माणेक पवना ज्युनिअर कॉलेज आणि कै. सौ. मिराबाई दशरथ भोंगाडे पवना प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण नुकतचे संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष खांडगे बोलत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक उद्योजक विलास काळोखे, दादासाहेब उऱ्हे, संस्थेचे जेष्ठ संचालक दामोदर शिंदे, महेशभाई शहा, पवना शिक्षण संकुलाचे पालक सदस्य सुनिल भोंगाडे, काशिनाथ निंबळे,कालेचे उपसरपंच छायाताई कालेकर, माजी मुख्याध्यापक भगवान शिंदे, अंजली दौंडे,दशरथ ढमढेरे, बबन तांबे, महादेव थोरात,वारूचे सरपंच हरिभाऊ निंबळे, माजी सरपंच मारुती काळे विश्वनाथ जाधव, लाला गोणते शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर, नारायण कालेकर, जमीन हक्क परिषदेचे अध्यक्ष ज्ञानदेव सोनवणे, माजी सरपंच भरत घारे बाळासाहेब मसुरकर, डॉ. सुभाष साबळे, डॉ.संजय बुटाला, विजय ठाकर, श्रीकांत मोहोळ, नितीन तुपे, पंढरीनाथ वरघडे, विष्णु शेंडगे, शहाजी कडु, एकनाथ पोटफोडे विलास वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना खांडगे म्हणाले की, सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यासाठी त्यांना शालेय पातळीवर तंत्रज्ञानयुक्त शिक्षण गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतः अद्यावत असणे गरजेचे आहे. याप्रसंगी बोलताना विलास काळोखे म्हणाले की, जिद्द, बुद्धी व मन बळकट असते तो कधीच पराभूत होत नाही. त्यासाठी मेहनत करावी यश आपोआपच आपल्याकडे खेचले जाईल. ( Pavana Vidya Mandir Annual Symposium and Prize Distribution Pavananagar Maval )
क्रीडा स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिके देण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थी सभागृहासाठी शाळेचे माजी विद्यार्थी विनायक राजीवडे व शाळेचे जेष्ठ अध्यापक राजकुमार वरघडे सर यांनी प्रत्येकी 51 हजार रुपयांची देणगी दिली. यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी केले. सुत्रसंचालन पुनम दुश्मन व कांचन जाधव, आभार प्राथमिक विभागाचे प्रमुख गणेश साठे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका अर्चना शेडगे, शिक्षक प्रतिनीधी गणेश ठोंबरे शिबीर प्रमुख वैशाली वराडे, मिनल खैरे, संदिप शिवणेकर, शिक्षकेतर प्रतिनिधी बाळासाहेब सातकर यांच्यासह सर्व अध्यापकांनी केले होते.
विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम संपन्न –
विद्यार्थ्यांनी आपली नृत्यातुन कला सादर करत पाहुण्यांचे मने जिंकुन घेतले. विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करून मान्यवरांची दाद मिळवली. पवनांकुंर हस्तलिखिताचे प्रकाशन सचिव संतोष खांडगे व शिक्षणविस्तार शोभाताई वहिले यांचे शुभहस्ते करण्यात आले. विद्यार्थांच्या कला गुणांना वाव मिळावा, यासाठी विज्ञान दालन, कला दालन, रांगोळी दालन व ग्रंथ दालन निर्माण करण्यात आले होते. पाहुण्यांचे शुभहस्ते दालनांची उद्घाटने करण्यात आली. संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी विविध विभागांतील उत्तम कामाबद्दल शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थी यांचे अभिनंदन करुन कौतुक केले. पुढील वर्षापासून हस्तलिखिताचे संस्था पातळीवर बक्षिस देण्याचे जाहीर केले.
अधिक वाचा –
– वडगावजवळ गॅरेजमध्ये सुरु होता जुगाराचा अड्डा, पोलिसांच्या धाडीत 7 जण गजाआड, हजारोंचा मुद्देमाल जप्त
– नाताळ, नववर्ष आणि शौर्य दिन : पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बंदोबस्तासाठी विशेष अधिकार प्रदान, वाचा नियम
– वडगावात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त गुरूचरित्र वाचन पारायण सोहळा; महिला भक्तांची लक्षणीय उपस्थिती