तब्बल 12 वर्षांपूर्वी अर्थात एक तपापूर्वी पवना धरण जलाशयातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी पिंपरी-चिंचवड शहराला नेण्याचा मुद्दा तापला आणि या प्रकल्पाविरोधात आंदोलनाची ठिणगी उडाली. प्रत्यक्षात 9 ऑगस्ट 2011 रोजी जेव्हा स्थानिक भूमीपुत्र शेतकऱ्यांनी या जलवाहिनी प्रकल्पाविरोधात मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर आंदोलन केले, तेव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या तीनही शेतकऱ्यांना वंदन करण्यासाठी दरवर्षी सर्व पक्षाचे नेते, पदाधिकारी सामान्य मावळकर आंदोलनाच्या त्या ठिकाणी आणि स्मृतीस्तंभ ठिकाणी येत असतात. ( pavana water channel project 12th years of maval firing case )
बुधवारी (दिनांक 9 ऑगस्ट 2023) रोजी शहिदांच्या 12 पुण्यस्मरणानिमित्त शिवसेना (उद्धव ठाकरे पक्ष) आणि काँग्रेस (आय) यांच्यावतीने प्रत्यक्ष जिथे आंदोलन झाले आणि गोळीबार झाला, त्याठिकाणी अर्थात बऊर इथे शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे बऊर इथे आणि येळसे येथील स्मृती स्थळी पूजन करुन वंदन करण्यात आले.
हेही वाचा – ‘आमच्या शेतकऱ्यांचे रक्तरंजित पाणी तुम्हाला प्यायचे आहे का?’, पवना जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करा, नाहीतर…
यावेळी पुणे जिल्हा शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचे संघटक तथा माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी उप जिल्हाप्रमुख भारत ठाकूर, काँगेस पक्षाचे तालुका अध्यक्ष यशवंत मोहळ, माजी सरपंच रामभाऊ सावंत, उप तालुकाप्रमुख सरपंच चंद्रकांत भोते, आंदोलनात जखमी झालेले मारुती खिरिड, शहर प्रमुख सुरेश गुप्ता, विद्यार्थी सेनेचे माजी तालुका अध्यक्ष महेश खराडे, उमेश ठाकर, अनिल भालेराव,अक्षय कालेकर, यश खराडे, सौरभ कडू, दत्तात्रय चोरघे, विशाल पाठारे, सुनिल इंगुळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. ( salute to martyrs from shiv sena thackeray group )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– लोणावळ्यात उतरले म्हणून टोलची रक्कम वाढली कशी? मराठी अभिनेत्रीने केली मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोलची ‘पोलखोल’
– पुणे जिल्ह्यात 9 ऑगस्ट रोजी सर्व शासकीय कार्यालयात घेतली जाणार पंचप्रण शपथ, काय आहे अभियान? जाणून घ्या
– उद्योजक रामदास काकडे यांना ‘भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग रत्न पुरस्कार’ जाहीर, बुधवारी पुरस्कार प्रदान सोहळा