Dainik Maval News : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आज, रविवारी 11 ऑगस्ट रोजी पुणे येथे मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली होणार आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक, शैक्षणिक व औद्योगिक राजधानी असलेले पुणे हे मिनी महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते. पुण्यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, खानदेश अशा सर्व विभागातील लाखो मराठे स्थायिक आहेत. पुण्याच्या रॅलीचे नियोजन झाले असून दहा लाखाहून अधिक मराठे रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुण्याच्या रॅलीची वैशिष्ट्ये :
– शहरात सर्वत्र भगवे झेंडे, स्वागत कमानी व कटआउट्स
– 2000 प्रशिक्षित स्वयंसेवक
– 5000 पोलिसांचा तगडा बंदोबस्त
– पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था
– 600 ध्वनिक्षेपक
– 8 LED स्क्रीनस्
– 20 ॲम्बुलन्स व वैद्यकीय पदके
– 2 टन फुलांचे हार व सजावट
असा असेल रॅलीचा मार्ग :
सारसबाग येथून सकाळी 11 वाजता रॅलीला सुरुवात होईल. त्यानंतर बाजीराव रोड, जंगली महाराज रोड, येथून पुढे डेक्कन खंडोजी बाबा चौकात रॅलीचे सांगता होईल. ( Peace rally and public meeting of Manoj Jarange Patil for Maratha reservation in Pune city )
पार्किंग व्यवस्था :
1. श्री शिवाजी मराठा सोसायटीचे अरण्येश्वर कॅम्पस
2. श्री शिवाजी मराठा सोसायटीचे शुक्रवार पेठ मामलेदार कचेरी समोरील लेन मधील मैदान
3. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे टिळक रोडचे न्यू इंग्लिश स्कूल मैदान
4. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूलचे रमणबाग शाळेचे मैदान
5. AISSMS संस्थेचे RTO ऑफिस शेजारील मैदान
5. फर्ग्युसन कॉलेजचे ग्राउंड
7. वीर नेताजी पालकर विद्यालय, शिवाजीनगर पोलीस लाईन
8. क्रीडा निकेतन दत्तवाडी
9. लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालय, रोकडोबा मंदिर शेजारी शिवाजीनगर
10. प्राथमिक विद्यालय महात्मा फुले पेठ
11. धर्मवीर संभाजी प्राथमिक विद्यालय नवी पेठ, शाळा क्रमांक ६७ घोरपडे पेठ
12. स. गो. बर्वे विद्यालय रास्ता पेठ, शाळा क्रमांक ९ नाना पेठ
13. सरदार कान्होजी आंग्रे प्राथमिक विद्यालय शुक्रवार पेठ
14. संत रामदास प्राथमिक विद्यालय वडारवाडी हेल्थ कॅम्प
15. हुतात्मा बाबू गेणू प्राथमिक विद्यालय बिबेवेवाडी
16. मनपा ग्राउंड प्राथमिक विद्यालय शेतकी विद्यापीठ आवार
17. वि. स. खांडेकर प्राथमिक विद्यालय सहकार नगर
18. भिडे पुलाशेजारील नदीपात्र
19. मॉडर्न मुलांची शाळा शिवाजीनगर ग्राउंड
20. मॅाडर्न इंजिनिअरींग कॅालेजचे पार्किंग
इत्यादी ठिकाणे पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
तसेच ज्या बांधवांना शक्य असेल त्यांनी मेट्रोचा आणि लोकलचा वापर करावा.
मराठा बांधवांना सूचना
– वाहने वरील पार्किंगमध्ये लावून सारसबाग येथून चालत रॅलीमध्ये सहभागी व्हावे.
– पावसाळ्याचे दिवस असल्याने छत्री/रेकनॉट घेऊन येणे
– लहान मुलांच्या खिशात नाव, पत्ता व संपर्क क्रमांकाची चिठ्ठी ठेवणे
– अफवांवर विश्वास ठेवू नये
– पोलीस व मराठा सेवकांच्या सूचनांचे पालन करावे
अधिक वाचा –
– नवउद्योजकांना प्रशिक्षणाची संधी, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीचा उपक्रम – वाचा सविस्तर
– वाढदिवस विशेष : पाच वेळा मावळ विधानसभा लढवली, दोन वेळा आमदार झाले, एक आमदारकी फक्त 459 मतांनी गेली
– शिवसेना मावळ परिवाराकडून एक्सप्रेस वे वरील ‘त्या’ ठिकाणी शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण । Maval News