Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पायी चालत जाणाऱ्या एका तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. ११ जून) रात्री उर्से गावाजवळ घडला.
अक्षय संतोष पाळेकर (वय २२, रा. बारामती) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ बगाड यांनी गुरूवारी (दि. १२) शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अक्षय पाळेकर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने चालत जात होते. उर्से गावाजवळ त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात अक्षय यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती न देता अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अहमदाबाद विमान दुर्घटना : विमानातील एक प्रवासी बचावला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती, मृतांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश
– एकीवर दोघांचे प्रेम आणि सोळा वर्षीय मुलाची हत्या… देहूरोड हादरलं ! भेटायला बोलावलं आणि चाकूने भोकसलं । Dehu Road Crime
– आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानंतर देहू नगरपंचायत प्रशासनाची तातडीने कारवाई ; रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली । Dehu News