Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी शुक्रवारी (दि.15) सांगवी, जांभूळ, ब्राह्मणवाडी, मोहितेवाडी, साते, कान्हे या गावांचा जनसंवाद दौरा केला. यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी अत्यंत आक्रमक भाषण केले. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर याही यावेळी उपस्थित होत्या.
लोकप्रतिनिधी जनतेवर उपकार करीत नाहीत – शेळके
आमदार शेळके म्हणाले की, माझी भावकी छोटी असली तरी तुम्ही सगळी गावकी माझ्या पाठीशी उभी केली. काम करण्यासाठी निवडून देता. कामे झाल्याचे समाधान लोकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. शासनाच्या योजनांतून सर्वसामान्यांना आधार देणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे. लोकप्रतिनिधी काम करून जनतेवर कोणतेही उपकार करत नाहीत. या गावात येऊन विरोधकांनी केलेल्या उपकाराच्या भाषेचा मी निषेध करतो.
मावळची जनता दमदाटीची भाषा खपवून घेत नाही. मी तालुक्यात कामे केली नाहीत, मी कार्यकर्त्यांवर अन्याय केला, हे विरोधकांना पाच वर्षांत दिसले नाही, पण महायुतीने माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर १५ दिवसांत या मंडळींना तसा साक्षात्कार झाला. मी कोणाला त्रास दिला नाही, कोणाला लुबाडले नाही. लोकांकडून व्याज घेतले नाही, गावागावात जाऊन दहशत केली नाही. त्यामुळे मायबाप जनता माझ्यावर प्रेम करते. तुमच्यावर करत नाहीत. यात माझा काय दोष, असा सवाल करीत आमदार शेळके यांनी विरोधकांचे वाभाडे काढले.
सख्ख्या नसलो तरी पक्क्या बहिणी – वर्षा नवघणे
आम्ही सर्वजणी सुनीलअण्णांच्या सख्ख्या नसलो तरी पक्क्या बहिणी आहोत, असे सांगत सरपंच वर्षा नवघणे यांनी आमदार शेळके यांनी ब्राह्मणवाडीच्या विकासासाठी केलेल्या कामांचा पाढाच वाचला.
आमची पॉलिसी सुनीलअण्णा
गावातील धनश्री दादाभाऊ शिंदे ही तरुणी अण्णांविषयी बोलताना म्हणाली, ‘आमच्या शिक्षणाची पॉलिसी सुनीलअण्णा, आमच्या आरोग्याची पॉलिसी सुनीलअण्णा, आमच्या सुरक्षिततेची पॉलिसी सुनीलअण्णा, एवढंच नाही तर आमच्या लग्नाची पॉलिसी पण सुनीलअण्णाच आहे.’
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सुनीलअण्णा तू एकटा नाही, मावळातील समस्त मातृशक्ती सदैव तुझ्या पाठीशी – रुपाली चाकणकर
– मावळात धक्कादायक प्रकार ; अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांनी महिला पत्रकाराला धमकावले, चार जणांविरोधात गुन्हा दाखल
– मतदारांनो… मतदान कार्डासह मतदानासाठी ‘हे’ 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावा म्हणून वापरता येणार – पाहा यादी