व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मायबाप जनता माझ्यावर प्रेम करते तुमच्यावर करीत नाही, यात माझा काय दोष ? सुनिल शेळकेंची विरोधकांवर टीका

लोकप्रतिनिधी जनतेवर उपकार करीत नाहीत - शेळके

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 16, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
people of Maval do not tolerate strong language MLA Sunil Shelke criticism of opposition

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी शुक्रवारी (दि.15) सांगवी, जांभूळ, ब्राह्मणवाडी, मोहितेवाडी, साते, कान्हे या गावांचा जनसंवाद दौरा केला. यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी अत्यंत आक्रमक भाषण केले. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर याही यावेळी उपस्थित होत्या.

लोकप्रतिनिधी जनतेवर उपकार करीत नाहीत – शेळके
आमदार शेळके म्हणाले की, माझी भावकी छोटी असली तरी तुम्ही सगळी गावकी माझ्या पाठीशी उभी केली. काम करण्यासाठी निवडून देता. कामे झाल्याचे समाधान लोकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. शासनाच्या योजनांतून सर्वसामान्यांना आधार देणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे. लोकप्रतिनिधी काम करून जनतेवर कोणतेही उपकार करत नाहीत. या गावात येऊन विरोधकांनी केलेल्या उपकाराच्या भाषेचा मी निषेध करतो.

मावळची जनता दमदाटीची भाषा खपवून घेत नाही. मी तालुक्यात कामे केली नाहीत, मी कार्यकर्त्यांवर अन्याय केला, हे विरोधकांना पाच वर्षांत दिसले नाही, पण महायुतीने माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर १५ दिवसांत या मंडळींना तसा साक्षात्कार झाला. मी कोणाला त्रास दिला नाही, कोणाला लुबाडले नाही. लोकांकडून व्याज घेतले नाही, गावागावात जाऊन दहशत केली नाही. त्यामुळे मायबाप जनता माझ्यावर प्रेम करते. तुमच्यावर करत नाहीत. यात माझा काय दोष, असा सवाल करीत आमदार शेळके यांनी विरोधकांचे वाभाडे काढले.

सख्ख्या नसलो तरी पक्क्या बहिणी – वर्षा नवघणे
आम्ही सर्वजणी सुनीलअण्णांच्या सख्ख्या नसलो तरी पक्क्या बहिणी आहोत, असे सांगत सरपंच वर्षा नवघणे यांनी आमदार शेळके यांनी ब्राह्मणवाडीच्या विकासासाठी केलेल्या कामांचा पाढाच वाचला.

आमची पॉलिसी सुनीलअण्णा
गावातील धनश्री दादाभाऊ शिंदे ही तरुणी अण्णांविषयी बोलताना म्हणाली, ‘आमच्या शिक्षणाची पॉलिसी सुनीलअण्णा, आमच्या आरोग्याची पॉलिसी सुनीलअण्णा, आमच्या सुरक्षिततेची पॉलिसी सुनीलअण्णा, एवढंच नाही तर आमच्या लग्नाची पॉलिसी पण सुनीलअण्णाच आहे.’

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सुनीलअण्णा तू एकटा नाही, मावळातील समस्त मातृशक्ती सदैव तुझ्या पाठीशी – रुपाली चाकणकर
– मावळात धक्कादायक प्रकार ; अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांनी महिला पत्रकाराला धमकावले, चार जणांविरोधात गुन्हा दाखल
– मतदारांनो… मतदान कार्डासह मतदानासाठी ‘हे’ 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावा म्हणून वापरता येणार – पाहा यादी


dainik maval jahirat

Previous Post

बापूसाहेब भेगडे आमदारकीचे प्रबळ दावेदार ; कामशेतमध्ये बापूसाहेब भेगडे यांच्या पदयात्रेत गर्दीचा उच्चांक । Bapu Bhegade

Next Post

खून प्रकरणी तिघांना अटक ; मावळ तालुक्यातील नानोली येथील प्रकार । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

खून प्रकरणी तिघांना अटक ; मावळ तालुक्यातील नानोली येथील प्रकार । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.