Dainik Maval News : जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून वराळे (ता. मावळ) येथील एका व्यक्तीची २१ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे. याप्रकरणी अज्ञात महिला आरोपीसह इतर संबंधित व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष दिलीप पांडकर (वय ४५, रा. वराळे, ता. मावळ) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. आरोपींनी ‘प्रेमजी न्यूज कमिटी’ या नावाखाली गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून फिर्यादींकडून पैसे उकळले. २३ जून २०२५ ते ९ जुलै २०२५ या कालावधीत फिर्यादींकडून २१,३५,००० रुपये विविध बँक खात्यांमध्ये वर्ग करून घेण्यात आले.
ही रक्कम येस बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच कोटक महिंद्रा बँक येथील खात्यांमध्ये स्वीकारण्यात आली. मात्र, कोणताही परतावा न देता आरोपींनी पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष पाटील करत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड ; मंगळवारी पालिकेची पहिली सभा
– अजित पवारांचा मोठा निर्णय ! एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन
– वडगाव नगरपंचायतीत भाजपाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी संदीप म्हाळसकर यांचे नाव जवळपास निश्चित
– मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

