पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणारा रस्ता म्हणजे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग . या मार्गावरुन दररोज लाखो गाड्या ये-जा करतात. या वाहनांची जणू वेगाशी-वाऱ्याशी स्पर्धा सुरूये असं वाटावं, इतका वेग असतो. यातूनच अनेकदा छोटे-मोठे अपघात होतात, ज्यात अनेकांना जीव गमवावा लागतो. द्रुतगती मार्गावर होणारे अपघात आणि त्यातून जाणारे जीव यांची कारणमीमांसा केल्यास नेहमी दोन वाहनांची धडक, गाडीला आग लागणे, गाडी दरीत कोसळणे किंवा पलटी होणे अशी कारणे समोर येतात. मात्र, शुक्रवारी (9 डिसेंबर) रोजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेला अपघात हा सर्वांना सावध करणारा आहे. ( Person On His Way To Wedding Program Died In Accident On Mumbai Pune Expressway )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मृत्यू असाही येऊ शकतो…
यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईकडून पुण्याकडे शुक्रवारी हॉटेल नोवोटेल (ॲड लॅब इमॅजिका) खालापूर इथे लग्न समारंभासाठी मिनीबसमधून प्रवासी निघाले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खालापूर टोलनाक्याजवळ बस आली असता त्यातील प्रवासी शैलेश तावडे ( वय 40, रा.जोगेश्वरी, मुंबई) हे लघुशंकेसाठी बसमधून उतरले आणि स्वच्छतागृहाच्या दिशेने जात होते. मात्र, त्यावेळीच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. धडकेमुळे शैलेश खाली पडले आणि त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात सर्वांनाच धडा शिकवणारा आहे. फक्त वाहन चालवतानाच नाही तर वाहनात बसताना, वाहनातून उतरतानाही आपण सावध राहणे आणि सतर्क राहणे आवश्यक आहे. अन्यथा मृत्यू कुठेही आणि कसाही येऊ शकतो, हे आपल्याला या घटनेतून दिसून येते.
अधिक वाचा –
– नातलग चिमुरडीवर बला’त्कार करणाऱ्या नराधमाला वडगाव मावळ पोलिसांकडून अटक; 13 डिसेंबरपर्यंत कोठडी
– स्व. दिगंबर भेगडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वडगावमध्ये रविवारी सर्वपक्षीय शोकसभा