Dainik Maval News : पुणे विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत आंबेगाव तालुक्यात मंचर गावचे हद्दीत चाकण रोडवरील पेट्रोल पंपासमोर चविष्ठ ढाब्याजवळ, भोरवाडी येथे वाहनाची तपासणी केली असता वाहनातून परराज्यनिर्मीत असलेला भांग मिश्रीत पदार्थाच्या वाहनासह एकूण 9 लाख 5 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांनी दिली आहे.
याप्रकरणी प्रविण मगाराम चौधरी, देहुफाटा, चाकण ता. खेड यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा अधिनियम १९४९ अन्वये १ डिसेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्हयामध्ये महालक्ष्मी आयुर्वेदिक फार्मानिर्मीत स्पेशल बावा विजयावटी भांग मिश्रीत पदार्थाने तयार केलेल्या गोळयांच्या पाकीटांनी भरलेल्या सुमारे ५० किलो ग्रॅमच्या एकूण ५ गोण्या अंदाजे २५० किलो ग्रॅम वजानाचे भांग मिश्रीत पदार्थ, एक पांढऱ्या रंगाचे मारुती सुझुकी कंपनीचे सीएनजी सुपर कॅरी मॉडेलचे चार चाकी वाहन क्रमांक व एक व्हिओ कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाईत निरीक्षक नरेंद्र थोरात, दुय्यम निरीक्षक विराज माने व धिरज सस्ते, प्रताप कदम, सतिश पौंधे, शशिकांत भाट,रणजीत चव्हाण, अनिल थोरात, अमोल दळवी, राहुल तारळकर सहभाग घेतला. अवैद्य दारू व्यवसाय करणाऱ्यावर अशाच प्रकारची कारवाई सूरू राहणार असून कोठेही अवैद्य दारू व्यवसाय सूरू असल्यास राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०२०-२९९११९८६ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देवाभाऊ 3.0 : “मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…” राज्यात नव्या ‘देवेंद्र’पर्वाचा आरंभ । Maharashtra New CM
– मुख्यमंत्री बनताच देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर, पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
– “मी अजित आशाताई अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की… अजित पवार यांनी विक्रमी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ