Dainik Maval News : आखाती देशात सध्या चालु असलेल्या युध्दाच्या पार्श्वभुमीवर घरगुती गॅसची टंचाई निर्माण होवू नये यासाठी घरगुती गॅस सिलेंडर मधुन अवैधरित्या व्यवसायिक (कमर्शियल) गॅस सिलेंडरमध्ये गॅस रिफीलिंगला प्रतिबंध करण्यासाठी कायदेशीर कारवाईचे आदेश पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी त्यांचे अधिपत्याखालील पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.
याअनुषंगाने असे गैर प्रकार आढळून आल्यास पोलिसांकडुन सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या अनुषंगाने सर्व नागरिकांना पोलीस आयुक्त यांनी आवाहन केले आहे की, घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलेंडर भरण्याचे कोणतेही अवैध प्रकार आढळून आल्यास तात्काळ पिंपरी चिंचवड नियंत्रण कक्ष फोन नंबर ०२० – २७३५२६००, २७३५२५००, ९५२९६९१९६६ व डायल ११२ वरही फोन करुन माहिती द्यावी, त्याची तात्काळ दखल घेवुन सबंधीतांवर कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण
– राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी
– मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली ; एलईडी दिव्यांमुळे होताहेत अपघात
